– शेवटच्या दिवसाअखेर 202 उमेदवारांनी भरले 270 नामनिर्देशन
– आज होणार नामांकन अर्जांची छाणणी
यवतमाळ :- जिल्ह्यातील यवतमाळ, वणी, आर्णी, पुसद, उमरखेड, राळेगाव, दिग्रस या विधानसभा मतदारसंघात आज एकून 136 उमेदवारांकडून नामांकन अर्ज दाखल झाले. नामांकनाच्या शेवटच्या दिवसाअखेर जिल्हाभरात एकून 202 उमेदवारांननी 270 नामनिर्देशनपत्र आपआपल्या निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. उद्या दि.30 ऑक्टोंबर रोजी अर्जांची छाणणी होणार आहे.
आज दाखल झालेल्या अर्जांमध्ये यवतमाळ विधानसभा मतदारसंघात एकून 17 नामांकन अर्ज दाखल झाले. त्यात मदन मधुकरराव येरावार (भारतीय जनता पार्टी), विजय तुळशीराम ठोंबरे (अपक्ष), शब्बीर खान रहेमान खान (इंडियन नॅशनल कॅाग्रेस व अपक्ष), संजय सदाशिव मेश्राम रिपब्लिकन पक्ष (खोरीपा), इंद्रपाल बळीराम डाहाणे (अपक्ष), सुरज गंगारामजी खोब्रागडे (संभाजी ब्रिगेड पार्टी), युवराज बाबुलाल आडे (अपक्ष), अशोक शंकर शेंडे (अपक्ष), संदीप संपत शिंदे (अपक्ष), सलीस शा सुलेमान शा (अपक्ष), साहेबराव विष्णु परडखे (कुणबी बहुजन स्वराज्य पार्टी), अमरदिप आनंदा वानखडे (अपक्ष), रमेश रामराव गिरोळकर (अपक्ष), विकास उत्तमराव लसंते (सन्मान राजकीय पक्ष), निरज ओमप्रकाश वाघमारे (अपक्ष), बाळु रामरावजी गावंडे (लोक स्वराज्य पार्टी), संजय खुशालराव खानविलकर (अपक्ष) यांचा समावेश आहे.
दिग्रस विधानसभा मतदारसंघासाठी 17 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात राठोड सुशिल शंकरराव (अपक्ष), अविनाश मधुकरराव इंगळे (अपक्ष), एजाज नवाब खान (अपक्ष), विवेक बाबाराव ठाकरे (अपक्ष), ठाकरे माणिकराव गोविंदराव (भारतीय राष्ट्रीय कॅाग्रेस), कांबळे राजेंद्र केशवराव (बहुजन समाज पक्ष), संदीप हनुमंतराव शिंदे (अपक्ष), नाजुकराव उदेभानजी धांदे (अपक्ष), कैलास विजय चव्हाण (अपक्ष), अतुल अशोक मुनगीनवार (अपक्ष), किशोर शेषराव चव्हाण (अपक्ष), अमोल ओमप्रकाश कोमावार (हिंदराष्ट्र संघ), श्याम जयसिंग चव्हाण (राष्ट्रीय समाज पक्ष), प्रमोद शंकर राऊत (अपक्ष), राठोड गणेश शंकरराव (अपक्ष), जगदीश काशिराम राठोड (अपक्ष), दिनेश प्रकाश सुकोडे (अपक्ष) यांचा समावेश आहे.
आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात निरंजन शिवराम मसराम (अपक्ष), संभा दिलीप मडावी (अपक्ष), गोवर्धन लिंबा आत्राम (अपक्ष), माधव बारकुजी टेकाम (वंचित बहुजन आघाडी व अपक्ष), नामदेव फकरु सोयाम (अपक्ष), मनोहर पंजाबराव मसराम (गोंडवाना गणतंत्र पार्टी व वंचित व वंचित बहुजन आघाडी), निता आनंदराव मडावी (प्रहार जनशक्ती पार्टी), प्रा.किसन रामराव अंबुरे (जन जनवादी पार्टी), सोमाजी माहदु मंगाम (अपक्ष), चंद्रकांत गोविंदराव उईके (अपक्ष), विठ्ठल किसनराव मरापे (अपक्ष), जितेंद्र शिवाजी मोघे (भारतीय राष्ट्रीय कॅाग्रेस), उमेश चंद्रभान उदे (अपक्ष), आरती मधुकर गेडाम (अपक्ष), सुभाष मारोती पवार (अपक्ष) यांचा समावेश आहे.
उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी 32 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात अशोक पुंडलिक गायकवाड (अपक्ष), सविता रामा पाचकोरे (अपक्ष), खडसे विजयराव यादवराव (अपक्ष), साहेबराव दत्तराव कांबळे (इंडियन नॅशनल कॅाग्रेस), प्रकाश राजाराम वाघमारे (अपक्ष), देवानंद भारत पाईकराव (अपक्ष), भिमराव गणपत भालेराव (अपक्ष), गोपिचंद मारोती दोडके (अपक्ष), मंजुषा राजू तिरपुडे (अपक्ष), रामराव लक्ष्मण गायकवाड (अपक्ष), मिनाक्षी चंद्रमणी सावतकर (अपक्ष), दिपक लक्ष्मण कांबळे (अपक्ष), पुजा अंबादास धुळे (अपक्ष), तातेराव मारोती हनवते (अपक्ष), सतिश प्रल्हाद इंगोले (अपक्ष), चंद्रमणी मारोती सावतकर (अपक्ष), राजेंद्र वामन नजरधने (महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अपक्ष), अरविंद बबन वाहुळे (अपक्ष), माधव किसन धुळे (अपक्ष), आत्माराम संभाजी खडसे (अपक्ष), किसन मारोती वानखेडे (भारतीय जनता पार्टी), भाविक दिनबाजी भगत (अपक्ष), डॅा.प्रेम गुणाजी हनवते (अपक्ष), राहुल आनंदराव मोहितवार (अपक्ष), विजय गोविंदराव कवडे (अपक्ष), डॅा.मोहन विठ्ठलराव मोरे (अपक्ष), मनोज गंगाधर कांबळे (अपक्ष), काळे कृष्णा ग्यानबा (अपक्ष), शिवशंकर श्रावण पांढरे (अपक्ष), संतोष सोमाजी कांबळे (अपक्ष), नथ्थू संभाजी लांडगे (अपक्ष), अंकूश युवराज रंजकवाड (अपक्ष), शंकर रेवणाजी मुनेश्वर (अपक्ष), राहुल साहेबराव शिरसाट (अपक्ष), सावते सुभाष ग्यानोबा (बहुजन समाज पार्टी) यांचा समावेश आहे.
पुसद विधानसभा मतदारसंघात 23 उमेदवारांनी नामांकन दाखल केले. त्यात गोपालकृष्ण बाबुसिंग जाधव (अपक्ष), मधुकर तुकाराम राठोड (अपक्ष), शेख नौशाद शेख सुलतान (अपक्ष), अलयार खान रहीम खान (अपक्ष), मनोज नत्थुजी तुंडलायत (तुंडे) (अपक्ष), ययाती मनोहरराव नाईक (अपक्ष), मजहर खान रहीम खान (अपक्ष), शेख जब्बार शेख युसुफ (अपक्ष), देविदास सोमला पवार (अपक्ष), माधव रुख्माजी वैद्य (वंचित बहुजन आघाडी), शरद आप्पाराव मैद (नॅशनलिस्ट कॅाग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार व अपक्ष), मधुकर हनगुजी एडतकर (अपक्ष), शरद यशवंत भगत (बहुजन समाज पक्ष), वजाहत अलीखान लियाकत अलीखान (अपक्ष), मनिष उर्फ मनोहर सुभाषराव जाधव (स्वाभिमानी पक्ष), विशाल बळीराम जाधव (अपक्ष), अश्विन रमेशलालजी जयस्वाल (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), नथ्थु दाऊ आगलावे (अपक्ष), शरद उर्फ बबन विठ्ठल जाधव (अपक्ष), राजु नथ्थुजी दुधे (अपक्ष), अवेस अहेमद सलीम अहेमद (अपक्ष), जयानंद विजय उबाळे (अपक्ष), मारोती किसनराव भस्मे (आझाद समाज पार्टी-कांशीराम) यांचा समावेश आहे.
राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात वसंत चिंधुजी पुरके (इंडियन नॅशनल कॅाग्रेस), उद्धव कपलू टेकाम (अपक्ष), सुरेश उत्तमराव मेश्राम (महाराष्ट्र राज्य समिती), जीवन देविदास कोवे (गोंडवाना स्वतंत्र पार्टी), किरण जयपाल कुमरे (वंचित बहुजन आघाडी व अपक्ष), बबनराव वासुदेव गेडाम (अपक्ष), सुभाष शंकर कासार (अपक्ष), रामदास बाजीराव घोडाम (अपक्ष), मनोज महादेव गेडाम (अपक्ष), सुधाकर बहेरू चांदेकर (अपक्ष), गोपाल यादव आडे (जनहित लोकशाही पार्टी), अशोक मारूती मेश्राम (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), अक्षय पंजाबराव आत्राम (बहुजन समाज पार्टी), सुरेश किसन कुमरे (लोकस्वराज्य पार्टी), नाना सटुजी सिडाम (वंचित बहुजन आघाडी व अपक्ष) यांचा समावेश आहे.
वणी विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवारांनी नामांकन दाखल केले. त्यात निखिल धर्मा दुरके (अपक्ष), अनिल घनश्याम हेपट (कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडिया), खाडे संजय रामचंद्र (इंडियन नॅशनल कॅाग्रेस व अपक्ष), केतन नत्थुजी पारखी (अपक्ष), राजेंद्र कवडुजी निमसटकर (वंचित बहुजन आघाडी), राहुल नारायण आत्राम (अपक्ष), संजय निळकंठराव देरकर (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे), प्रविण रामाजी आत्राम (राष्ट्रीय गोंडवाना पार्टी), सुनिल गणपतराव राऊत (अपक्ष), देवराव आत्माराम वाटगुरे (अपक्ष), अरुणकुमार रामदास खैरे (बहुजन समाज पार्टी), यशवंत शिवराम बोंडे (अपक्ष), नारायण शाहू गोडे (अपक्ष), पाते हरिश दिगांबर (अपक्ष), अजय पांडुरंग धोबे (संभाजी ब्रिगेड पक्ष), आसिम हुसेन मंजुर हुसेन (अपक्ष), संतोष उद्धवराव भादीकर (अपक्ष) यांचा समावेश आहे. या उमेदवारांनी त्या-त्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.