मनपा बस सेवेतील चालक वाहकांच्या वेतनात वाढीचा अखेर निर्णय झाला.आ प्रविण दटकेंच्या प्रयत्नांना यश..! 

नागपूर :- महाराष्ट्र राज्यातील मनपा परिवहन सेवेतील विशेषतः बस सेवेत कार्यरत असलेल्या चालक वाहक कर्मचाऱ्यांची गेल्या १५ वर्षांपासून पगार वाढीची मागणी प्रलंबित होती. १५ वर्षांच्यां वेतन निश्चितीद्वारे हे समस्त चालक वाहक कार्यरत होते व तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा सांभाळ करत होते. या सोबतच अनेक आर्थिक अडचणीना देखील त्यांना समोर जावं लागत होते. मागील अनेक महिन्यांपासून शासन स्तरावर याबाबतीत प्रयत्न सुरू होते.

नागेश सहारे आणि विजय गटलेवार ह्यांच्या पुढाकाराने कामगार युनियन आणि भारतीय मजदुर संघाचे अनेक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. तसेच कामगार युनियन आणि भारतीय मजदुर संघातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी देखील लावून धरण्यात आली होती. आमदार प्रविण दटके, नागेश सहारे आणि भारतीय मजदुर संघाचे विजय गटलेवार यांनी सातत्याने हा विषय सोडविण्याचे प्रयत्न केले व आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मनपा वाहन चालक कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात आली. गेल्या १५ वर्षांपूर्वी १३ हजार रु. असलेला पगार आता १८ हजार पर्यंत वाढवण्यात आल्यामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या यशाबाबत कमलेश वानखेडे, निलेश पौनिकर, प्रविण नरवले, उत्तम शेंडे, सुमित चिमोटे, विक्की चौधरी, राजेंद्र चौधरी दिपक वानखेडे, नरेंद्र निंबाळकर, विनोद सोनटक्के या कर्मचाऱ्यांनी समस्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आमदार प्रविण दटके यांचे आभार मानले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी साधला राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद

Tue Oct 15 , 2024
– विकास कामांना सर्वांनी सहकार्य करावे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन मुंबई :- राज्य शासनामार्फत अनेक विकास कामे व प्रकल्प राबविण्यात येत आहेत. विकास कामांतून नागरिकांचे जीवनमान उंचावणार असल्याने या विकास कामांना सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना केले. राज भवन येथे झालेल्या या बैठकीस माजी राज्यपाल राम नाईक, खासदार अनिल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com