समाजभूषण चंद्रशेखर बावनकुळे यांचा महासभेच्या वतीने सत्कार

नागपूर :- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पुढाकाराने राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस अजित पवार व मंत्रिमंडळाचे मान्यतेने आणि प्रांतिकचे राज्य अध्यक्ष रामदास तडस, समाजाचे ज्येष्ठ नेते भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आपले तडफदार महासचिव डॉ.भूषण कर्डिले, कार्याध्यक्ष अशोककाका व्यवहारे, कोषाध्यक्ष गजानन शेलार, उपाध्यक्ष संजय विभूते, प्रकाश देवतळे, सहसचिव बळवंतराव मोरघडे, सुनील चौधरी, जयेश बागडे, व्यापारी आघाडी अध्यक्ष पोपटराव गवळी, सेवा आघाडी अध्यक्ष सुभाष पन्हाळे,महिला आघाडी अध्यक्ष पुष्पा बोरसे, युवक आघाडी उपाध्यक्ष विपिन पिसे आणि समाजाचे ज्येष्ठ नेते,सर्व विभागीय अध्यक्ष, जील्हाध्यक्ष, पालक बॉडी, युवा, महिला, सेवा आघाडी पदाधिकारी यांचे अनेक दिवसापासूनचे अथक प्रयत्न व परिश्रमातून शासनाने अखेर ८ ऑक्टोबर ला “श्री संत संताजी जगनाडे आर्थिक विकास महामंडळाची “स्थापना करण्याचा शासन जी.आर काढला. त्यामुळे तेली समाजातील गरीब, गरजू, विद्यार्थी, शेत्तकरी व व्यापारी, व इतर सर्व समाजातील लोकांना फायदा होणार आहे.त्यामुळे तेली समाजात सर्वत्र आनंद असून याबाबत महासभेच्या वतीने वरील सर्वांचे अभिनंदन व आभार त्या प्रित्यर्थ आज ज्येष्ठ नेते भाजपाचे राज्य अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब याचे विशेष आभार मानून त्यांचा शाल,गुच्छ व मिठाई देऊन सत्कार ,प्रांतिक सहसचिव बळवंतराव मोरघडे व नागपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण बावनकुळे यांचे नेतृत्वात त्यांचे निवासस्थान कोराडी येथे करण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने प्रांतीक पदाधिकारी सर्वश्री किशोरराव भिवगडे, रमेश कारेमोरे, राकेश भावालकर, सुभाष ढबाले, रमेश उमाटे, गणेश गडेकर, नरेंद्र हटवार, गजानन दांडेकर, देवेंद्र बारई, महेश बावनकुळे, अड.प्रकाश घटे, श्रीधरराव मोटघरे,निखिल भुते, चेतन देशमुख, आणि महिला पदाधिकारी कल्याणि भुरे, भंडारा आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दीनदयाल नगर च्या पडोळे चौकात विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर धरणा आंदोलन 15 ऑक्टोबर रोजी

Sat Oct 12 , 2024
नागपूर :- विदर्भ कोकण ग्रामीण बैंक मुख्य कार्यालय, चंद्रप्रस्थ 3 रा माळा, दिनदयाळ नगर, पडोळे चौक, नागपूर समोर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी / अधिकारी तसेच मृत कर्मचारी / अधिकारी यांचे वारसान त्यांचे विविध प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी येत्या 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या दरम्यान धरणा देणार आहेत. प्रमुख मागण्या, 1) बँक व्यवस्थापनाने तत्कालीन वैनगंगा क्षेत्रीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com