खासदार श्यामकुमार बर्वे यांची शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला भेट

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितांमुळे नागरिकांना करण्यात येणाऱ्या दूषित पाणी पूरवठ्यामुळे 500 च्या आत रुग्ण अतिसार,टायफाईड,उलटी, हगवण ला बळी पडले दरम्यान कामगार नगर रहिवासी एक 32 वर्षीय तरुणी दगावली .या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आज सकाळी 11 वाजता कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत रुग्णांची पाहणी करून आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला दरम्यान उपस्थित जलप्रदाय अभियंता अवी चौधरी यांना जलशुद्धीकरण केंद्रातील भोंगळ कारभार तडकाफडकी बंद करून यासारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची तंबी दिली.व नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे फर्मान दिले.यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचे सुद्धा सांगितले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती प्रा अवंतिका लेकुरवाडे, वैद्यकीय अधिक्षिका डॉ नयना दुपारे ,आरोग्य कर्मचारी, सह नागरिक गण प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी

Sat Oct 12 , 2024
– महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती रायगड :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचे सी – २९५ या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. या विमानांना वॉटर कॅनानद्वारे अनोखी सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई ३० (Sukhoi) विमानानेही यशस्वी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com