नरसी मोनजी संस्थेमुळे नागपुरात केजी टू-पीजी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे मोठे दालन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज कॅम्पसचे भूमिपूजन

Ø नागपुरातील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा राखीव आणि शैक्षणिक शुल्कामध्ये 20 टक्के सूट

नागपूर :- शहरातील आयकॉनिक संस्थांच्या यादीत नरसी मोनजी शैक्षणिक संस्थेमुळे भर पडणार असून केजी टू पीजी पर्यंतचे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे दालन उभारले जाणार आहे. नागपूर आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे, प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

देशभरातील उत्तम कॅम्पस प्रमाणे या संस्थेचा नागपुरातील कॅम्पस राहणार असा विश्वास व्यक्त करत या संस्थेत शहरातील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा राखीव आणि शैक्षणिक शुल्कामध्ये 20 टक्के सूट राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एस.व्ही.के.एम.) या अभिमत विद्यापीठाच्या प्रस्तावित नागपूर कॅम्पसचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमास आमदार कृष्णा खोपडे आणि मोहन मते, माजी खासदार विजय दर्डा, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, एस.व्ही.के.एम. चे अध्यक्ष तसेच एन.एम.आय.एम.एस. विद्यापीठ मुंबई चे कुलपती आमदार अमरीश पटेल आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्या देशामध्ये उत्तम प्रकारचे महाविद्यालये, शाळा आणि शैक्षणिक संस्था असतात त्या देशाचा विकास गतीने होतो. तसेच कुशल मनुष्यबळ उपलब्ध असेल तेथे उद्योग मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. कुशल मनुष्यबळाला जगभरात महत्व आले असून असे मनुष्यबळ घडवणाऱ्या आयकॉनिक संस्था ज्या शहरात असतात त्या शहराची विकासाकडे वाटचाल होत असते. या सर्व बाबींचा विचार करूनच नागपूरमध्ये एम्स, आयआयएम, ट्रिपल आयटी, विधी विद्यापीठ अशा आयकॉनिक संस्था आल्या आहेत. या माळेत नरसी मोनजी संस्थेचा समावेश झाला असून शहराची ओळख एज्युकेशन हब म्हणून होत आहे.

नागपूर मनपाची जागा या संस्थेसाठी देण्यात आली असून त्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता राखण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील नामांकित संस्था म्हणून ओळख असणाऱी ही संस्था नागपुरातही रचनात्मक काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, पूर्वी वाठोडा लेआऊट भागातील या जागेवर कचऱ्याचे ढिगार होते आता येथे नरसी मोनजी च्या माध्यमातून शिक्षण सेवेचे कार्य घडेल. नागपूर व विदर्भातील गरजू मुलांना दर्जेदार शिक्षण घेवून प्रगती साधता येईल. ऑरेंज कॅपीटल, टायगर कॅपीटल, हेल्थ हब सोबतच आता शहराची एज्युकेश हब म्हणून ओळख निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थेसाठी मनपाची 18.35 हेक्टर जागा भाडेपट्ट्याने

नागपूर मनपाकडून 18.35 हेक्टर जमिनीवर नर्सरीपासून ते प्री-प्रायमरी आणि बहु-विद्याशाखीय उच्च अभ्यासक्रमापर्यंतचे शिक्षण देणारी संस्था निर्माण व्हावी याकरिता ही जागा 1 रुपये प्रती चौरस फुट प्रती वर्ष या दराने शैक्षणिक संस्थेला भाडेपट्टयाने देण्यात आली आहे.

नागपूर शहरातील वाठोडा येथील 45 एकर क्षेत्रावर अत्याधुनिक, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार अशा केजी टू पीजी भव्य शैक्षणिक कॅम्पस साकारले जाणार आहे. 420 कोटींच्या निधीतून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक भांडवली गुंतवणुक श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संस्थेकडून करण्यात येणार आहे. नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अभिमत विद्यापीठाच्या प्रस्तावित नागपूर कॅम्पसमध्ये नागपूर जिल्ह्यातील रहिवासी विद्यार्थ्यांकरिता वरील 25 टक्के जागांसाठी प्रवेश शुल्क सवलतीच्या दराने आकारण्यात येईल. ही सवलत 20 टक्के दराने देण्याचे देकार निविदेमध्ये अंतर्भूत केले आहे. या कॅम्पसमध्ये एकूण 4 हजार 40 विद्यार्थी पटसंख्या असेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 7600 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी

Thu Oct 10 , 2024
– नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमुळे महाराष्ट्राची आरोग्य सेवा अधिक बळकट – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी –  नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाच्या कामाचे भूमीपूजन –  शिर्डी विमानतळ येथे नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी मुंबई :- महाराष्ट्रात दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून राज्याची आरोग्यसेवा अधिक बळकट होणार आहे. यामुळे राज्यातील एकूण वैद्यकीय जागांची संख्या 6000 होणार आहे. विकासाचा प्रत्येक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com