उन्हाळ्यापासून सावंगी रोडवरील पथदिवे बंद

कोदामेंढी :- येथील सावंगी रोडवरील, स्मशान घाटापर्यंतच्या चार पथदिव्यावरील पथदिवे उन्हाळ्यापासून बंद असून त्या पोलांवर व तारांवर काटेरी झाड लोम्बकळत असून झाडांची छटाई करून पथदिवे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सावंगी रोडवरील सुर नदीवरील पुलिया झाल्यामुळे या रस्त्यावरील वर्दळ वाढलेली आहे, मात्र कोदामेंढी ते सावंगी या रोडावर रात्रीला पथदिवे बंद असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य असते, त्यामुळे येथे पथदिवे लावण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली.

याबाबत येथील दिवाबत्ती कर्मचारी नथू सोनटक्के यांना भ्रमणध्वनी वरून विचारपूस केली असता येथील सरपंच आशिष बावनकुळे हे काम संबंधित लाईनमनचे असल्याचे सांगत असल्याचे सोनटक्के यांनी सांगितले, तर पथदिव्यासंबंधी लाईनचे काम हे ग्रामपंचायतकडे असल्याचे अरोली महावितरणचे सहाय्यक अभियंता सुहास चौरे यांनी भ्रमणध्वनी वरून सांगितले.

तार तुटल्यावर व पोल पडल्यावर संबंधित ग्रामपंचायत प्रशासन व महावितरण प्रशासन पथदिवे लावण्याची कारवाई करणार का ?असा प्रश्न या रोडवरील अंधाराचे साम्राज्यापासून त्रस्त असणाऱ्या जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी मांडला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अल्पसंख्यांक बहुल योजनेतून मोर्शी मतदार संघांमध्ये 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर ! 

Mon Oct 7 , 2024
– आमदार देवेंद्र भुयार यांचे नागरिकांनी मानले आभार ! मोर्शी :- मोर्शी वरूड तालुक्यात असलेल्या अल्पसंख्याकबहुल असलेल्या नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, अल्पसंख्याक वस्त्यांचा विकास व्हावा आणि त्या ठिकाणी राहणार्‍या नागरिकांचे जीवनमान उंचावे यासाठी मोर्शी वरूड तालुक्यातील १५ अल्पसंख्याकबहुल ग्रामपंचायतीला प्रत्येकी २० लाखांचा निधी आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नाने विशेष बाब म्हणून मंजूर झाल्याने मोर्शी वरूड तालुक्यातील जवळपास १५ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com