आम आदमी पार्टीचा संघ बिल्डिंग वर ‘जवाब दो मोर्चा’, अरविंद केजरीवाल यांनी विचारले मोहन भागवत यांना पाच प्रश्न

नागपुर :- आम आदमी पार्टी – नागपुर शहर तर्फ़े आर एस एस मुख्यालय संघ बिल्डिंग, बडकस चौक येथे जवाब दो मोर्चा महाराष्ट्र संगठन सचिव भूषण ढाकुलकर व शहराध्यक्ष अजिंक्य कळंबे यांच्या नेतृत्वात काढन्यात आले. यावेळी प्रामुख्याने राज्यसचिव डॉ शाहिद अली जाफरी, शहर संघटन मंत्री रोशन डोंगरे, सचिन लोनकर व प्रदीप पौनीकर, शहर उपाध्यक्ष संगीता बाहतो व नामदेव कांबडी, शहर महासचिव डॉ अमेय नारनवरे, ग्रामीण उपाध्यक्ष शैलेश गजभिये, ग्रामीण संघटन मंत्री शौकत अली बागबान हे प्रामुख्याने उपस्तीत होते.

यावेळी सहा लोकांचं शिष्टमंडळ पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून संघ बिल्डिंग येथे नेण्यात आल. या शिष्टमंडळात राज्य संघटन मंत्री भूषण ढाकुलकर, राज्य सचिव डॉ शाहिद अली जाफरी, शहर अध्यक्ष अजिंक्य कळंबे, महिला अध्यक्ष सुषमा कांबळे, शहर संघटन मंत्री रोशन डोंगरे व प्रदीप पवनीकर उपस्थित होते. या शिष्टमंडळा बरोबर आरएसएस चे प्रतिनिधी म्हणून अजय जलताडे यांनी चर्चा केली.

आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्ली राज्याचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजीवालांनी आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारले आहेत. RSS हे भाजपचे मातृतुल्य संस्था आहे. भारतीय संस्कृती अनुसार पालक आपल्या पाल्याला तत्त्वावर चालण्याची देखील शिकवण देतो. भाजपा द्वारे ED आणि CBI चा वापर करून भ्रष्टाचारी नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेणे बरोबर आहे का? याचा जवाब अरविंद केजरीवाल यांनी मागितलेला आहे.

इमानदार नेत्यांना डावलून भ्रष्टाचारी लोकांना समोर आण्याचा मोदींचा कट भागवत यांना मान्य आहे का? हे जवाब मागण्यासाठी आपचा आर एस एस मुख्यालय वर मोर्चा ७०,००० कोटीचा घोटाळा करणारे अजित पवार यांच्यावर आरोप लावणारे पंत प्रधान मोदी यांनी फक्त ५ दिवसात भाजपात प्रवेश करून उपुख्यमंत्री केले असे अनेक प्रकार घडले आहेत याचे जवाब मागण्या साठी आर एस एस मुख्यालय बडकस चौक येथे आप चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने चिटणीस पार्क येथून मोर्चा काढला.

यावेळी तनुजा वाटकर गुडधे, विपिन कुर्वे, सुषमा कांबळे, अलका पोपटकर, संजय बोरकर, विनोद गौर, पुष्पा डाबरे, मंजू पोपळे, जॉय बांगरकर, गिरीश तितरमारे, प्रणित डोंगरे, किशन निमजे, प्रशांत अहिरराव, प्रज्ञाजीत सोमकुवर, सुनील मॅथ्यू, क्लायमेट डेव्हिड, सुरब दास, तिडके काका, मनोज डोंगरे, तन्मय सरोदे, अंकित ठाकरे, राहुल ठाकरे, सचिन पारधी.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हर घर दुर्गा हे अभियान देशासाठी प्रेरणादायी - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

Tue Oct 1 , 2024
– कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ मुंबई :- हर घर दुर्गा हे अभियान देशासाठी प्रेरणादायी आहे. देशातील तरुणींमध्ये दुर्गासारखी शक्ती आणि सामर्थ्य येवुन अन्याय आणि अत्याचाराला प्रतिकार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हे अभियान नक्कीच मोलाची भूमिका बजावेल.कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमातून कुशल व रोजगारक्षम युवा घडत आहेत ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असे मत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com