“पौर्णिमा दिवस” निमित्त क्रीडा चौकात जनजागृती

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी महापौर व माजी आमदार प्रा.अनिल सोले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पौर्णिमा दिवस अभियानांतर्गत शुक्रवारी (ता.२०) रात्री क्रीडा चौक परिसरात जनजागृती करण्यात आली.

नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा चौक येथे पौर्णिमा दिवस’ साजरा करण्यात आला.याप्रसंगी माजी आमदार प्रा. अनिल सोले, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, बिष्णुदेव यादव,  प्रिया यादव, पार्थ जुमड, पिनाकी बनिक, अपूर्व देव आदींनी जनजागृती केली.

या अभियानाला क्रीडा चौक परिसरातील व्यावसायिक, दुकानदार, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. जनजागृती दरम्यान स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले व नागरिकांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात स्वच्छता मोहीम, कठड्यांना केली रंगरंगोटी

Tue Sep 24 , 2024
– दीक्षाभूमीच्या स्वच्छतेसाठी भीमपुत्रांचा पुढाकार – स्वच्छता मोहिमेला विरोध; शांततेच्या मार्गाने काढला मार्ग नागपूर :- दीक्षाभूमी आणि परिसरातील स्वच्छतेसाठी भीमपुत्र विनय भांगे यांच्या पुढाकारातून जवळपास 40 तरुणांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली. 14 ऑक्टोबर आणि विजयादशमीच्या दिवशी लाखो अनुयायी दीक्षाभूमीला भेट देतात, अशावेळी त्यांच्या गैरसोयीचा विचार करून ही मोहीम हाती घेण्यात आली. स्वच्छता मोहिमेसोबतच, रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांच्या सोयीसाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com