ललित कला विभागाचे कलास्थानम कडून कौतुक आणि आभार 

नागपूर :- राष्ट्रकवी रामधारी सिंह ‘दिनकर’ रचित ‘रश्मीरथी’ या खंडकाव्यावर आधारित एकपात्री नाटकातून नरभूषण कर्ण यांच्या महाभारतातील वर्ण संघर्षाची कहाणी वर्णन करण्यात आली. ‘दिनकर’ यांच्या पन्नासाव्या पुण्यस्मृती वर्षानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभाग आणि छंद मंदिर यांच्या विद्यमाने या नाटकाचा प्रयोग गुरुनानक भवन येथे झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्याम कोरेटी होते. यावेळी ललित कला विभाग विभागप्रमुख डॉ. संयुक्ता थोरात, आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य, अजय पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सुरभी बेगूसराय निर्मित ‘रश्मीरथी’ या नाटकात अभिनेता-निर्देशक हरीश हरीऔध यांनी अभिनय तर प्राक्कथन जयंत गडेकर यांनी केले. प्रकाशव्यवस्था लेखक आशिष कुलकर्णी यांनी सांभाळली. संगीत विष्णू देवदास यांनी दिले. “रश्मिरथी” या (एकल प्रस्तुती) कार्यक्रमाच्या सुंदर, मनमोहक व यशस्वी आयोजनाकरिता कलास्थानम बहुद्देशीय संस्थेच्या वतीने कार्यक्रम संयोजक व आयोजनात संम्मेलीत सर्वांचे अभिनंदन करीत भविष्यातील प्रत्येक उपक्रमाला कला स्थानम बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रत्यक्ष शुभेच्छा प्रदान करण्यात आल्यात व या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कृणाल म. सोनटक्के, उपाध्यक्ष पवन भू. गायग्वाल, सचिव स्वप्नील म. समर्थ, सहसचिव ऋषिकेश पोहनकर, कोषाध्यक्ष शैलेश वासनिक, सदस्य रानू कृ. सोनटक्के, चित्रा प. गायग्वाल, ममता स्व. समर्थ, अपर्णा अ. शंभरकर, चारू लो. साहू आणि सदस्यांची सक्रिय उपस्तिथी लाभली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मालमत्ता धारकांना करात सवलत जाहीर

Mon Sep 23 , 2024
– सुटीच्या दिवशीही भरता येणार कर चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करणाऱ्या नागरिकांना करात सवलत देण्यात येत असुन ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा ऑफलाईन पद्धतीने केल्यास ८ टक्के तर ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्यास १० टक्के सुट देण्यात येत आहे. तसेच कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने ३० सप्टेंबर पर्यंत येणाऱ्या प्रत्येक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com