गरोदर मातांची प्रसूती आरोग्य संस्थेमध्येच करा- आयुषी सिंह

• गृह प्रसुतीत 50 टक्के घट

गडचिरोली :- जिल्ह्यातील सर्व शासकीय रूग्णालयात प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेअंतर्गत गर्भवती मातांचे रक्त, लघवी, रक्तदाब, हिमोग्लोबीन, अल्ट्रासाऊंड आदी तपासण्या तज्ञांकडुन केल्या जातात व त्यानुसार वैद्यकीय सल्ला दिला जातो. या सुविधेचा लाभ जिल्ह्यातील गरोदर मातांनी घ्यावा तसेच माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर मातांची प्रसूती घरी न करता आरोग्य संस्थेमध्येच करण्याचे आवाहन आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे. ”

घरी प्रसुतीचे प्रमाण 50 टक्केंनी घटले

सन 2024-2025 मध्ये (एप्रिल ते ऑगस्ट पर्यंत) 5,353 प्रसुति आरोग्य संस्थेत करण्यात आलेल्या आहेत तर 57 प्रसुति घरी झाल्या आहेत. तसेच मागील वर्षी याच कालावधीत (एप्रिल-23 ते ऑगस्ट-23 पर्यंत) संस्थात्मक प्रसूती 5916 तर घरी झालेल्या प्रसुती ची संख्या 102 होती. 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 संस्थात्मक प्रसूती 15 हजार 756 तर घरी प्रसूती 301 होती. एप्रिल ते ऑगस्ट पर्यंतच्या आकडेवारीची तुलना केली असता चालू सहामाहीत संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वाढलेले असुन घरी होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण 50 टक्क्यानी कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.

आरोग्य विभाग अंतर्गत 52 प्राथमिक आरोग्य केन्द्र, 33 प्राथमिक आरोग्य पथक , 12 शहरी आरोग्य मंदिर,2 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, 376 उपकेन्द्र , 3 उपजिल्हा रुग्णालय , 9 ग्रामीण रुग्णालय , 1 सामान्य रुग्णालय , व 1 स्त्री रुग्णालय कार्यान्वित आहेत. जिल्हयात आरोग्य विभागामार्फत जननी सुरक्षा योजना , प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, मातृत्व अनुदान योजना व मानव विकास मिशन अंतर्गत गरोदर मातांना बुडीत मजुरी अनुदान व तज्ञाचे मार्फतीने गरोदर माता व 0 ते 6 महिने वयोगटातील बालकाची आरोग्य तपासणी प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. संस्थात्मक प्रसुतिचे प्रमाण वाढवणेसाठी गरोदर माता ट्रॅकींग, नियंत्रण कक्ष, माता बैठक, माहेर घर योजना, गृहभेट हा पंचसुत्री कार्यक्रम राबविला जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हा परिषदेतर्फे 89 अनुकंपाधारकांची समुपदेशनाद्वारे नेमणूक

Thu Sep 12 , 2024
गडचिरोली :- जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदांवर 89 अनुकंपा प्रतिक्षा यादीतील 89 उमेदवारांना निमणूक देण्यात आली. यासाठी 10 सप्टेंबर रोजी गट-क व गट-ड मधील प्रतिक्षासुचीमधील उमेदवारांना त्यांची जेष्ठता, शैक्षणिक अर्हता व पदांचे उपलब्धतेनुसार समुपदेशन घेण्यात आले होते. गट-क संवर्गात एकुण 51 पदांवर तर गट-ड संवर्गात एकुण 38 पदांवर अशी एकुण 89 पदांवर जिल्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com