सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 48 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवार (05) रोजी शोध पथकाने 48 प्रकरणांची नोंद करून 64,800/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 800/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 300/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 800/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 27 प्रकरणांची नोंद करून 54,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000 रुपयांची वसुली करण्यात आली.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून 1,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 5 प्रकरणांची नोंद करून 5,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. संदीप पुंसे यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत रू. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. हनुमान नगर झोन अंतर्गत मे. शाहु गणेश मुर्ती भंडार व मे. देवांश आर्ट यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 20,000/- चे दंड वसुल करण्यात आले. नेहरुनगर झोन अंतर्गत महेश सहारे व मे. सत्यम मुर्ती आर्ट यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 20,000/- चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. नारायणी आर्ट, निखिल शोसटे, मे. राजु मुर्ती भंडार, महेश गायकवाड, मे. सागर मुर्ती आर्ट यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 50,000/- चे दंड वसुल करण्यात आले.

सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. विश्वास ट्रेडर्स यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोन अंतर्गत आशु र्निगुलकर, मोहीत गारगी यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 20,000/- चे दंड वसुल करण्यात आले. आशीनगर झोन अंतर्गत मे. बालाजी मुर्ती आर्ट, मे. शाहु मुर्ती भंडार यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 20,000/- चे दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत पंकज मेश्राम, मे. श्री. आर्ट गणेश, मे. नव दुर्गा मुर्ती सेंटर यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 30,000/- चे दंड वसुल करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उप मुख्यमंत्री अजित पवार आज गडचिरोली जिल्ह्यात

Fri Sep 6 , 2024
गडचिरोली :- उप मुख्यमंत्री अजित पवार 06 सप्टेंबर 2024 रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहतील. दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अहेरी येथे आगमन. सकाळी 11.15 वा. राजे धर्मवीर शाळा, रेड्डी कॉम्पलेक्स, अहेरी रोड, नागेपल्ली येथे रक्षाबंधन कार्यकम. सकाळी 11.45 वा. सावरकर चौक, आलापल्ली येथे आदिवासी बंधू-भगिनींमार्फत पारंपारिक नृत्य कार्यक्रम सादरीकरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com