आरक्षित व पुररेषा भागात बांधकाम चालू आढळल्यास होणार निष्कासित

– बांधकाम करणारे व सहायकांवर होणार गुन्हे दाखल

– ड्रोनद्वारे होणार पाहणी

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आरक्षित व पुररेषा भागात केल्या जाणारी बांधकामे निष्कासित करण्यात आली असुन यापुढे सदर परिसरात कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम केल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

आरक्षित तसेच पुररेषा भागात (ब्लू लाईन) कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्री अथवा कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम करता येत नाही. पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूररेषेच्या आत कोणतेही बांधकाम व्हायला नको, नदी किनारी असलेली बांधकामे, अतिक्रमणे, नदीपात्रातील काँक्रीटीकरण यामुळेे पुराची पातळी वाढत जाण्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. मा. उच्च न्यायालयात दाखल याचिकेत सुद्धा ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.

आरक्षण क्र.७० व आरक्षण क्र.७१ महाकाली यात्रा मैदान ही भूखंडे आरक्षित आहेत. या भूखंडांवर सुद्धा अतिक्रमण करून बांधकामे केल्याचे आढळुन आल्याने सदर बांधकामे पाडण्याची कारवाई यापूर्वी मनपातर्फे करण्यात आली आहे. यापुढे आरक्षित व ब्लू लाईन परिसरात संभाव्य धोक्याची पर्वा न करता जर कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम केल्यास अथवा बांधकाम करण्याची तयारी सुरु दिसल्यास, गिट्टी, विटा स्वरूपाचे साहित्य,बांधकाम मजूर आढळुन आल्यास संबंधित बांधकामाचे साहित्य प्रथमदर्शनी जप्त करण्यात येणार असुन सुरु असलेले बांधकाम पाडण्यात येणार आहे.

बांधकामात सहभागी असणारे जागा मालक, कंत्राटदार,मजूर यांच्यावर व बांधकामास मदत करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात येत आहे. याकरिता मनपाद्वारे विशेष निगराणी पथक तयार केले असून त्यांचे मार्फत सदर परिसराची रोज पाहणी केली जाणार आहे. तसेच आवश्यक असल्यास ड्रोनचा वापर केला जाईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उत्सवादरम्यान परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुरु

Wed Sep 4 , 2024
– १३७ मंडळांनी केले अर्ज चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाप्रसंगी सार्वजनीक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानगीसाठी सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी प्रणालीस (single window system ) चांगला प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत १३७ सार्वजनीक गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज सादर केले आहेत. या सर्व मंडळांना प्रशासनाच्या विविध विभागातर्फे परवानगी देण्याची कारवाई सुरु आहे. येत्या ७ सप्टेंबरपासून शहरात दहा दिवस गणेशोत्सव साजरा होणार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!