नागपूर :- बालेवाडी, पुणे येथे १२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत आयोजिय १७व्या सब-ज्युनिअर रोलबॉल राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघात नागपुरातील सेंटर पॉईंट स्कूल वर्धमान नगर शाखेतील निष्का सुमित बिंदल (मुलींच्या संघात) व अवनीशसिंग दिपकसिंग बनकोटी (मुलांच्या संघात) यांची निवड करण्यात आली आहे. १७ आणि १८ ऑगस्ट २०२४ ला चिखली, बुलढाणा येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर संघाकडून केलेल्या उत्कृष्ट खेळ प्रदर्शनाच्या जोरावर अवनीश व निष्का नी महाराष्ट्र संघात राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली.
नागपूर जिल्हा रोलबॉल संघटनेचे पदाधिकारी व सचिव शैलेंद्र पाराशर यांनी दोन्ही खेळाडूंना व त्यांच्या पालकांना निवडीवर आनंद व्यक्त करीत अभिनंदनपर शुभेच्छा प्रदान केल्यात.
कृपया आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्र माध्यमातून वरील माहिती प्रसिद्ध करीत खेळाडूंना प्रोत्साहित करावे, ही नम्र विनंती.