संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठीकर मोकाट जनावरांना वैतागले
कामठी :- कामठी शहरातील नागपूर जबलपूर महामार्गावरील पोलीस स्टेशन समोर,हॉकी बिल्डिंग चौक, जयस्तंभ चौक,बस स्टँड चौक, नगर परिषद समोर, ड्रॅगन पॅलेस भुयार पुलिया आदी मार्गावर मोकाट जनावरांचा मुक्त संचार कायम असून हे मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसले असतात .ज्यामुळे या मार्गावरून मार्गक्रमण करणारे वाहनधारक वैतागले आहेत.या मोकाट जनावरांचा कामठी नगर परिषद ने कोंडवाड्या अभावी बंदोबस्त केला नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मोकाट जनावरांचे टोळके या मुख्य रस्त्यावर बिनधास्तपणे बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.या मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगर परिषदेने त्वरित करावा अशी मागणी येथील जागरूक नागरिक करीत आहेत .
..कामठी शहरातील मुख्य चौक असलेल्या मोटर स्टँड चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक दारांची रेलचेल असते तसेच शालेय विद्यार्थी हाच रस्ता ओलांडून शाळेत जात असतात दरम्यान येथील एखाद्या मोकाट जनावराने एखाद्या शाळकरी विद्यार्थीला वा एखाद्या नागरिकाला धडक देऊन शिंग मारल्यास वा जीवितहानी होण्याची घटना घडल्यास याला कोण जवाबदार राहणार तसेच एखाद्याची जीवितहानी होईल तेव्हाच नगर परिषद ला जाग येईल का?असा प्रश्न येथील जागरूक नागरिक करीत आहेत.