डेंग्यू व चिकनगुनिया नियंत्रणासाठी आतापर्यंत ६ लाख ४४ हजार घरांचे सर्वेक्षण

– आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्याचे मनपाचे आवाहन 

नागपूर :- नागपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता प्रसार रोखण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य विभाग सज्ज आहे. आरोग्य विभागाद्वारे मनपाच्या दहाही झोन निहाय तापरुग्णांचे सर्वेक्षण केले जात असून, आतापर्यंत ६ लाख ४४ हजार ०४६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार झोननिहाय चमू कार्य करीत आहेत. घरी आणि परिसरात डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये यासाठी नागरिकांनी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यूचा लारवा पाण्यात वाढत असल्यामुळे कुठेही पाणी जमा होऊ नये याची काळजी घ्यावी. कुलर, कुंड्या यातील पाणी दररोज बदलावे. याशिवाय ताप असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, तसेच आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले आहे.

सोमवारी (ता:२६) मनपा मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी लक्ष्मीनगर झोन कार्यालयाला भेट देत परिसराची पाहणी केली. यावेळी डेंग्यू व चिकनगुनिया नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनेसह परिसराची नियमित स्वच्छता आणि धूर फवारणी यासंदर्भात माहिती जाणून घेतली. गोयल यांनी पाहणीची संपुर्ण माहिती मनपा आयुक्त यांना दिली.

याप्रसंगी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

या सर्वेक्षणामध्ये आशा स्वयंसेविका घरोघरी भेट देऊन तापरुग्णांची माहिती घेतात. याशिवाय कंटेनर सर्वेक्षण अंतर्गत घरात आणि परिसरात पाणी जमा राहणाऱ्या वस्तूंची पाहणी केली जात आहे. सोमवार २६ ऑगस्टपर्यंत मनपाच्या दहाही झोनमधील ६४४०४६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात १६७७ कुलर, ३५३८ टायर, १६९९३ कुंड्या, ८१७९ ड्रम, ३१७८ मडके, २७०३ पक्षी व प्राण्यांची भांडी आणि ५५९० इतर भांड्यांमध्ये डेंग्यूचा लारवा आढळून आला. लारवा आढळलेल्या ठिकाणी औषध टाकण्यात आले आहे.

घरी आणि परिसरात डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये यासाठी नागरिकांनी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यूचा लारवा पाण्यात वाढत असल्यामुळे कुठेही पाणी जमा होऊ नये याची काळजी घ्यावी. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिव्यांगांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न - ना.नितीन गडकरी 

Mon Aug 26 , 2024
– सौर ऊर्जाचलित मोटराईज्ड ट्रायसिकलचे वितरण नागपूर :- दिव्यांगांना स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. ट्रायसिकल वितरित करताना दिव्यांगांना त्यांचा अधिकार प्रदान करण्याचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) येथे केले. ना. गडकरी यांच्या हस्ते नागपूर शहरातील ३० अस्थिव्यंग दिव्यांगांना सौर ऊर्जाचलित मोटराईज्ड ट्रायसिकलचे वितरण करण्यात आले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com