स्वच्छ नागपूर साकारण्यासाठी मनपाची “आत्मनिर्भर वार्ड” संकल्पना 1 सप्टेंबरपासून

– नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन

नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिका कार्यतत्पर आहे. मनपाद्वारे 1 सप्टेंबरपासून शहरात “आत्मनिर्भर वार्ड” संकल्पना राबविण्यात येणार आहे, आत्मनिर्भर वार्ड संकल्पनेच्या अनुषंगाने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात घनकचरा विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह संपूर्ण चमू शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी तत्पर आहे. मनपाद्वारे राबविण्यात येणाऱ्या “आत्मनिर्भर वार्ड” अंतर्गत वार्ड मध्ये शुन्यकचरा (Zero-waste) कार्यक्रम राबविणे, ओला व सुका कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे, ओला कचऱ्याचे कॅपोस्टिंग करणे आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत. याकरिता आत्मनिर्भर वार्ड म्हणून प्रत्येक झोनमधील एका प्रभागाची निवड करण्यात आली आहे.

आत्मनिर्भर वार्डमध्ये निवड करण्यात आलेल्या प्रभागातील कचरा संकलन करणाऱ्या वाहनामध्ये पार्टीशन, सॉऊंड सिस्टीम, घातक कचऱ्याचा डब्बा, जी.पी.एस प्रणाली व इतर आवश्यक बाबी असणार असून, प्रभागातील घरांमधून वर्गीकृत कचरा संकलित केला जाणार आहे.

आत्मनिर्भर वार्डमध्ये बी.डब्ल्यु.जी./आर.डब्ल्यु.ए तसेच स्वयंसेवी संस्था यांचा समावेश असलेली स्वावलंबी वार्ड समिती तयार करण्यात येणार आहे. आत्मनिर्भर वार्डमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची त्याच वार्डमध्ये विल्हेवाट लावण्याकरिता डी-सेंट्रलाईज प्रोसेसिंग युनिट बसविण्यात येणार आहे. नागरिकांनी देखील “आत्मनिर्भर वार्ड” यशस्वीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

असे असणार आत्मनिर्भर वार्ड   

घनकचरा विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले की, आत्मनिर्भर वार्ड म्हणजे असे वार्ड जेथे उत्पादित कचरा 100 टक्के वर्गीकृत्‍ करुनच कचरा संकलीत करणाऱ्या वाहनात देण्यात येणार आहे. जेथे वार्ड सिमेच्या आत 100 टक्के ओला कचऱ्यावर प्रकिया करण्यात येईल व 100 टक्के सुखा कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात येईल, असे वार्ड ‘आत्मनिर्भर वार्ड’ ठरेल.

“आत्मनिर्भर वार्ड” करिता निवडलेले प्रभाग

1) लक्ष्मीनगर झोन – प्रभाग 16,

2) धरमपेठ झोन – प्रभाग 15,

3) हनुमान नगर झोन – प्रभाग 31,

4) धंतोली झोन – प्रभाग 35,

5) नेहरुनगर झोन – प्रभाग 28,

6) गांधीबाग झोन – प्रभाग 18,

7) सतरंजीपुरा झोन – प्रभाग 5,

8) लकडगंज झोन –प्रभाग 23,

9) आशीनगर झोन – प्रभाग 7,

10) मंगळवारी झोन – प्रभाग 1.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी नगर विकास कृती समिती,कामठी च्या आमरण उपोषणाची सांगता

Thu Aug 22 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागपूर शहराचे उपनगर मानले जाणाऱ्या कामठी शहराला दोन दोन आमदार लाभूनही कामठी शहर अजूनही मूलभूत सोयी सुविधांसह विकासापासून वंचीत आहे .तेव्हा कामठी शहरातील सर्वसामान्य जनतेच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित व रखडलेल्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी कामठी नगर वासियाच्या वतीने कामठी नगर विकास कृती समिती,कामठीने राजकुमार उर्फ सुगत रामटेके यांच्या नेतृत्वात कामठी तहसील कार्यालय समोर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com