खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस कन्हान पोलीसांनी केले अटक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- फुकट नगर प्रभाग क्रं.४ कांद्री- कन्हान चे रहिवासी नंदकिशोर साहनी चा दिवाळीत जुगार खेळण्यावरून आरोपीशी भांडण झाले होते. तेव्हा त्यास जेल झाली. आता जेल मधुन सुटुन आल्यावर फिर्यादीच्या घरी तलवार घेऊन जाऊन घराचा दरवाजा तोडुन शिविगाळ करून जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. तसेच काकाच्या घराचा दरवाजा तोडुन त्यांच्या मुलीला शिविगाळ करित विट फेकुन मारल्याने कन्हा न पोस्टे ला चार आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

नंदकिशोर साहनी व स्वप्निल मराठे, लकी भेलावे यांच्यात दिवाळीत जुगार खेळण्यावरून भांडण झाले होते. तेव्हा स्वप्निल मराठे यानी पुर्ण कुंटुबाला जिवे मारण्याची धमकी दिल्याने नंदकिशोर साहनी यानी तक्रार केल्याने स्वप्निल मराठे ला जेल झाली होती. तो आता जेल मधुन सुटुन आल्यावर गुरूवार (दि.१५) ऑगस्ट ला रात्री १० ते १०.३० वाजता दरम्यान फिर्या दी नंदकिशोर चंदारी साहनी वय २४ वर्ष रा. फुकट नगर प्रभाग क्रं.४ कांद्री- कन्हान हे आपल्या घरी अस ताना आरोपी १) स्वप्नील मराठे उर्फ चुहा, २) सागर चव्हाण दोघे दुचाकीने हातात तलवार घेऊन शिवीगाळ करित आल्याने घरात गेलो असता तू माझ्या विरोधात तक्रार देऊन फसवलं आहे, आता मी तुला मारेन, असं म्हणत घराचा दरवाजाला लाथ, दगड, विट मारू न तोडला. आणि जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवा रीने वार केले, परंतु तो वार चुकुन तेथून पळ काढला, त्यानंतर हा स्वप्निल मराठे मागे धावत येऊन गळ्याला पकडुन त्याने डोक्याला व तोंडावर वीट मारल्याने तोंडातुन रक्त निघाले. परिसरातील लोक मध्यस्थी करण्यास आले असता स्वप्नील मराठे व सागर चव्हाण तेथुन पळाले. अर्ध्या तासानंतर रात्री अकराच्या सुमा रास अमन कैथवास व लकी भेलावे हे दोघे घराजवळ आले व त्यांनी शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी देऊन तेथुन पळ काढल्याने त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देत असता स्वप्नील मराठे व लकी भेलावे यांनी पुन्हा माझ्या घराच्या दरवाजाला लाथ मारली आणि माझ्या काकाच्या घराचा दरवाजा तोडला. मुलगी कु. कांचन सहानी हिला वीट फेकुन मारून शिवीगाळ करून तेथुन पळाले. अश्या फिर्यादी च्या तक्रारी वरून कन्हान पोलीसानी आरोपी १) स्वप्नील मराठे उर्फ चुहा, २) सागर चव्हाण ३) अमन पप्पु कैथवास तिघेही रा. हरिहर नगर, कांद्री कन्हान ता. पारशिवनी नागपुर व ४) विनय उर्फ लकी भेलावे रा. नाका नं.७ कन्हान- कांद्री यांचे विरूध्द कलम १०९, ३२४ (४), २९६, ३५१(२), ३५१(३), ३(५), भा. न्या.संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सपोनि राहुल चव्हान हे करित आरोपीचा शोध घेणेकामी पथक तयार करून आरोपीचा शोध घेवुन आरोपी विनय उर्फ लकी भेलावे याला अटक केली.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ग्रामीण भागातील वयोवृध्द महिलांना गंडा घालून फसवणुक करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील सदस्याला स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण ने केले जेरबंद

Sun Aug 18 , 2024
नागपूर :- नागपूर ग्रामीण घटकात वयोवृध्द महिलांना गंडा घालून त्यांची फसवणुक करणारी आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांची टोळी मागील काही दिवसांपासून सक्रिय झाली होती. या टोळीतील गुन्हेगार वयोवृध्द महिलांना एकटे गाढून त्यांना पैश्याचे आमिश दाखवून त्यांचे अंगावरचे दागीने हातचालाखीने उतरवित असायचे व संधी साधून पसार होत व्हायचे, नागपूर ग्रामीण जिल्हयात मागील एक महिण्यांपासून कळमेश्वर, काटोल, खापरखेडा, मौदा या ग्रामीण भागात वयोवृध्द महिलांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com