संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी कन्हान मार्गावरील साई मंदिर समोरील मार्गाने रामटेकहुन नागपूर कडे दुचाकीने जात असलेल्या विवाहित पती पत्नीला समोरून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार ने येणाऱ्या तीन आरोपी पैकी एकाने दुचाकी थांबवून पतीला हातबूक्याने मारझोड करीत पत्नीचा विनयभंग करून तिच्या गळयातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला व ओरडल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.मात्र पीडित पत्नीने जोमाने ओरडत मदतीची मागणी केली असता रस्त्याहुन येणारे लोक बघताच सदर आरोपीने घटनास्थळाहून पळ काढण्यात यश गाठले तर या घटनेने आरोपींचा महिलेचा मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न फासला ही घटना 14 ऑगस्ट च्या सायंकाळी साडे सहा दरम्यान घडली.
यासंदर्भात नागपूर रहिवासी पीडित महिलेने नविन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार क्र एम एच 31 सी एच 2006 मधील तीन आरोपी विरुद्ध बीएनएस 309(5),74,115,(2),3,(5)अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढोल तपास सुरू आहे.