पती पत्नीचा वादाची मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाचा खून

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गणेश ले आऊट येथे भाड्याने राहणाऱ्या पती पत्नीच्या वादात मध्यस्थी करत भांडण सोडवायला गेलेल्या इसमाच्या गळयावर संतप्त पतिने चाकूने वार करून जीवानिशी ठार केल्याची घटना गतरात्री घडली असून मृतकाचे नाव पंकज नत्थुलाल सोलंकी वय 22 वर्षे रा गणेश ले आऊट कामठी असे आहे.तर खून करणाऱ्या आरोपी पतीचे नाव महेश जीवनलाल उके वय 32 वर्षे रा गणेश ले आउट कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गतरात्री आरोपी पती महेश उके आपल्या पत्नीसह वाद घालत असताना आरोपीच्या साळयाने आरोपीला रागाच्या भ्रमात बोलणे सुरू केले दरम्यान आरोपीने पत्नीशी होत असलेला वाद सोडून साळ्याशी भांडण करणे सुरू केले यावेळी शेजारी राहणाऱ्या मृतक तरुणाने मध्यस्थी करून भांडण संपविण्याचा प्रयत्न केला असता संतप्त आरोपी पतीने भांडण सोडवायला आलेल्या मृतक तरुणाच्या गळ्यावर घरातील चाकूने वार करून जीवानिशी ठार केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे,एपीआय सचिन यादव यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत आरोपी पती महेश उके विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.ज्यामुळे वादाची मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाच्या जीवावर बेतली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा; प्रशासनाने ऑनफिल्ड सज्ज राहावे

Sat Jul 27 , 2024
– लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण, निवारा केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध कराव्यात – ‘अलमट्टी’तील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करा  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना मुंबई :- कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचाव कार्याची आवश्यकता वाटल्यास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com