अवघ्या बारा तासाच्या आत घरफोडीचा पर्दाफाश करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गुरुकृपा कॉलोनी येथील एका घरातून अज्ञात चोरट्यानी 4 लक्ष 70 हजार 300 रुपयांची घरफोडी केल्याची घटना 22 जुलै ला दुपारी 3 दरम्यान घडली असता यासंदर्भात फिर्यादी आकांक्षा सिंग वय 35 वर्षे रा गिट्टीखदान नागपूर ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध तपासाला गती देत घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज वरून आरोपीचा शोध लावण्यात यश गाठले व अवघ्या बारा तासाच्या आत घरफोडीचा पर्दाफाश करीत तीन चोरट्याना अटक करण्यात यश गाठल्याची यशस्वी कामगिरी नवीन कामठी पोलिसांनी केली असून अटक आरोपीचे नाव प्रकाश खंडाईत वय 24 वर्षे रा हिवरा,मयूर तायवाडे वय 21 वर्षे रा सावरगाव,आदित्य गभने वय 20 वर्षे रा तारसा असे आहे.या अटक चोरट्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही यशस्वी कारवाही पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल,सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, ,अप्पर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे, पोलीस उपायुक्त निकेतन कदम,एसीपी विशाल क्षीरसागर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनार्थ डी बी स्कॉड प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव,डी बी स्कॉड चे विलास देवगडे, नरेश खरगबाण, पवन शिरसाठ, श्याम फोकमारे,हेमचंद सोनोने, विशाल पौणिकर,राहुल वाघमारे, नसीम अन्सारी,आशिष भुरकुंडे,श्याम गोरले ,दीप्ती मोटघरे आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्रीमती किशोरीताई भोयर महाविद्यालयात गुरू पौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली

Wed Jul 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- श्रीमती किशोरीताई भोयर अध्यापक महाविद्यालय कामठी येथे बी. एड. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गुरुंबद्दल श्रद्धा व भक्ती भाव व्यक्त करण्यासाठी गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी केली. गुरूंचे वेळोवेळी भेटणाऱ्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे उपकार मानण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम महाविद्यालयात नुकताच पार पडला.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती व अध्यक्षा प्राचार्य डॉ. शुभलक्ष्मी जगताप यांना शाल व श्रीफळ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com