नागपूर :- गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कांचन गडकरी यांनी आपले व आपल्या आईचे गुरु परमपूज्य परिव्राजकाचार्य योगमूर्ती श्री जनार्दनस्वामींच्या पवित्र समाधीचे दर्शन रामनगर स्थित जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळात जाऊन घेतले. गडकरी यांच्या मातोश्री कै. भानु गडकरी पूज्य स्वामीजींच्या शिष्या होत्या आणि त्यांनी महाल विभागात महिलांसाठी निःशुल्क योगवर्ग सुरू केला होता, हे विशेष!
ह्या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्रद्धेय खांडवे, कार्यवाह मिलिंद वझलवार आणि इतर पदाधिकारी व अनेक योगसाधक उपस्थित होते. मंडळाने जनार्दनस्वामी योगविद्यापीठ स्थापन करावे तसेच शालेय सांघिक योगासन स्पर्धा हा मंडळाचा अत्यंत महत्त्वाचा व समाजोपयोगी कार्यक्रम दर दोन वर्षों ऐवजी दरवर्षी घेण्यात यावा असे सूचित केले. जुन्या आठवणींना उजाळ देत आई विषयी आठवणी सांगत मंत्रीमहोदय व त्यांच्या सुविद्य पत्नी यांची अतिशय आनंदात ही अनौपचारिक भेट झाली. मंडळाच्या शांत वातावरणात आणि स्वामीजींच्या दर्शनाने प्रसन्न चित्त होवून कार्यकर्त्यां समोर त्यांनी आपले मंडळा विषयी प्रेम व समाधान व्यक्त केले.