संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कर्बला च्या शहिदांच्या स्मरनार्थ आज 15 जुलै ला हैदरी चौक कामठी येथे अध्यक्ष कामरान जाफरी अली ग्रुप कामठी च्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरात 300 च्या वर संख्येतील रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.या रक्तदान शिबिरात लाईफलाईन ब्लड सेंटर च्या वैद्यकीय चमूने विशेष आरोग्य सेवा पुरविली.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयोजक कामरान जाफरी,अली ग्रुप कामठी , हैदरी जामा मस्जिद ट्रस्ट हुसैनाबाद कामठी,अली सामाजिक संस्था कामठी,अंजुमने अबबासिया हुसैनाबाद कामठी,अंजुमने महाफीजे अजा हुसैनाबाद कामठी, कायमे मेहंदी,हैदरी चौक कामठी,जाफरी ग्रुप हैदरी चौक, कामठी, आदी संस्थानी सहयोगाची भूमिका दर्शविली.