नागपूर :- शरदचंद्र पवारांनी दिलेल्या शब्द फतर ची लकिर आहे ते शब्दांचे पक्के आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाला सोबत घेऊन आंबेडकरी मतदानाचे विभाजन टाळून महाविकास आघाडी राज्यात विराजमान करण्यासाठी सोबत राहू असे चर्चा करताना बोलत होते. आंरिमो चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे प्रा.रमेश दुपारे प्रफुल्ल इंगोले यांनी सिल्वर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची औपचारिक भेट घेतली. याप्रसंगी बागडेंनी मागील लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवारांना राज्यातील विविध मतदारसंघात रिपब्लिकन मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम याची जाण करून दिली. पवार यांनी कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.