सिल्लोड तालुक्यातील ३४०० रेशनकार्ड धारकांबाबत लवकरच निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मुंबई :- छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील ३४०० रेशनकार्ड धारकांबाबत लवकरच कार्यवाही करणार असल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत सांगितले.

यासंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला.

मंत्री भुजबळ म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर मधील सिल्लोड तालुक्यातील ८ हजार ९२१ शेतकरी लाभार्थ्यांच्या कार्डची छाननी केली आहे. त्यापैकी १९९५ रेशन कार्ड धारकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे.यातील १५०३ रेशन कार्ड धारकांना धान्याची मागणी केली आहे त्याप्रमाणे त्यांना धान्य वितरण करण्यात येत आहे. डीबीटीमध्ये पात्र असलेली २२८५ रेशनकार्ड धारक आहेत. जी कोणत्याच निकषात बसत नाहीत अशी १२४ कार्डधारक आहेत. ज्यामध्ये काही ना काही त्रुटी आहेत अशी ३४०० रेशनकार्ड धारक आहेत याबाबतीतही लवकरच कार्यवाही पूर्ण करून निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री भुजबळ म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अतिरिक्त कार्यभाराबाबत लवकरच निर्णय - मंत्री चंद्रकांत पाटील

Sat Jul 6 , 2024
मुंबई :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ४५ विभाग आहेत. त्यातील ३७ खात्यांना नियमित प्राध्यापकाकडे प्रत्येकी एकच विषय आहे.उर्वरीत ८ खातेप्रमुखाकडे अतिरिक्त पदभार आहेत.यांचे पदभार कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्या विभागप्रमुखांकडे अतिरिक्त कार्यभार आहे त्याबाबतीत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उत्तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com