बजेरिया येथे राजकुमार गुप्ता चौकाचे महापौरांच्या हस्ते नामकरण व लोकार्पण

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रविवारी (ता. २०) प्रभाग क्र. १९ बजेरिया येथे राजकुमार गुप्ता चौकाचे नामकरण व लोकार्पण महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमात पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, नगरसेवक ऍड. संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, खादी व ग्रामोद्योगाचे केंद्रीय सदस्य जयप्रकाश गुप्ता, माजी नगरसेवक बाबा शेळके, शेख हुसेन, संतोष गुप्ता, नंदकिशोर गौर, मनोज बैसवारे, चमन प्रजापती, अजय गौर, रमाकांत गुप्ता, उमेश वारजूरकर, हरीश महाजन, अशोक नायक, प्रशांत गौर, जयंत तेलंग, नयन शाहू, प्रल्हाद नायक, प्रवीण श्रीवास, दुर्गीश प्रजापती, महेश चक्रधारे, आकाश गौर, नरेश गुप्ता, जगदीश गुप्ता, अमित गुप्ता, रवी गुप्ता, बनवारी गुप्ता, अभिषेक गुप्ता आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, राजकुमार गुप्ता यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. काही व्यक्ती ठराविक उद्दिष्ट घेऊन राजकारणात येतात मात्र राजकुमार गुप्ता यांनी राजकारणात राहून समाजकारण केले. नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन ते स्वतःच्या पार्टीतील वरिष्ठ नेत्यांविरोधात आंदोलन करीत होते. घंटानाद आंदोलनाची सुरुवातही राजकुमार गुप्ता यांनी केली असल्याची माहिती यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.
कार्यक्रमाचे संचालन ब्रजभूषण शुक्ला यांनी तर आभार राकेश गुप्ता यांनी मानले.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कन्हान परिसरात छ. शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती थाटात साजरी

Mon Feb 21 , 2022
कन्हान : – परिसरात स्वराज्य संस्थापक बहुजनाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती “शिव जन्मोत्सव सोहळा विविध सामाजिक संस्था व घरोघरी विविध कार्यक्रमाने थाटात साजरी करण्यात आली.  शहर विकास मंच द्वारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य शिवाजी  मान्यवरांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत शिव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com