कन्हान वॉटर वर्क्सचे 30 तासांचे शटडाउन आकस्मिक विद्युत बिघाडामुळे पुढे ढकलले…

नागपूर :- नागपूर महानगरपालिका ऑरेंज सिटी वॉटर (NMC-OCW) कन्हान जलशु‌द्धिकरण केंद्राचे नियोजित 30 तासांचे शटडाउन आकस्मिक विद्युत बिघाडामु‌ळे पुढे ढकलल्याची घोषणा करते.

29 जून 2024 रोजी रात्री 22:30 वाजता, कन्हान जलशुद्धिकरण केंद्रात 33KV क्युबिकलवर अनपेक्षित विद्युत बिघाड झाला. आवश्यक दुरुस्तीचे काम 30 जून 2024 रोजी 16:30 वाजेपर्यतच पूर्ण होऊ शकले.

या 18 तासांच्या बिघाडामुळे पाणीपुरवठा सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या पुरवठ्याच्या वेळेत खंडित झाला. या खंडित पाणीपुरवठ्याचा परिणाम कन्हान फीडर मुख्य नलिकां‌द्वारे पुरवठा होणाऱ्या एकूण बत्तीस कमांड क्षेत्रे आणि दोन थेट टॅपिंग्सवर झाला. या क्षेत्रांमध्ये मुख्यतः आशी नगर झोन, सतरंजीपुरा झोन, लाकडगंज झोन आणि नेहरू नगर झोनचा समावेश आहे.

प्रभावित रहिवासी आणि व्यवसायिकांनी या काळात दाखवलेल्या सहकार्याबद्दल आणि समजूतदारपणाब‌द्दल आम्ही आभारी आहोत.

पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करु शकतात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेती चोरी करणाऱ्या आरोपीतांना अटक

Mon Jul 1 , 2024
– पोलीस स्टेशन मौदा ची कार्यवाही मौदा :- पोस्टे मौदा येथील स्टाफ पो. स्टे. हद्दीत स्टाफसह अवैध रेती वाहतूकीस आळा घालणेकरिता पेट्रोलिंग करीत असताना भंडारा ते नागपूर NH-53 रोडवर ट्रक क्र. MH- 40/BF-1951 हा येताना दिसल्याने बोरगाव शिवारातील चोरगाव बस स्टॉप जवळ नाकाबंदी दरम्यान ट्रक थांबवून पाहणी केली असता १२ चाकी ट्रक क्र. MH-40/BF-1951 मध्ये अंदाजे १० ब्रास रेती मिळून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!