संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- शहरातील शिवाजी नगर येथिल विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद, राष्ट्रीय बंजरग दल स्थापना दिवस उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र गोवा विदर्भ प्रांत महामंत्री किशोर दिकोंडवार, विदर्भ प्रांत उपाध्यक्ष मुन्ना ओझा, प्रांत संपर्क प्रमुख नंदु गट्टुवार, राष्ट्रीय बजरंग दल नागपुर महानगर अध्यक्ष हर्षल धर्माडे, जेष्ठ नागरिक मूलचंद शिंदेकर, गजराज देवियां, छोटुजी सींग, शरद डोणेकर, रविसिंग सोलंकी, सुनिल चिखले, मूकेश कश्यप सह मान्यवरांचा हस्ते छत्रपति शिवाजी महाराजांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादना कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विधिवत पूजा अर्चना करुन हनुमान चालीसाचे पाठन करण्यात आले.
राष्ट्रीय बजरंग दलाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, आमचे ध्येय एकच आहे , जो कोणी हिंदूंचे रक्षण करेल, देव त्याचे रक्षण करेल, हा राष्ट्रीय बजरंग दल आहे, जे हिंदूंचे रक्षण करतात त्यांना जीवाची पर्वा नसते, ते फक्त देश आणि धर्माचे रक्षण करतात कारण आम्ही छत्रपती शिवाजी महारा जांचे वंशज आहोत, प्रत्येक धर्माचे रक्षण करणारा तो राष्ट्रीय बजरंग दल आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय बजरंग दलचे विदर्भ प्रांत महामंत्री किशोर दिकोंडवार यांनी युवकांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन करतांनी संबो धित केले. कार्यक्रमात जेष्ठ नागरिक आणि यूवकांचा भगवा दुपट्टा घालुन आणि हनुमान चालीसा पुस्तक वितरण करुन सत्कार करुन राष्ट्रीय बजरंग दल स्थाप ना दिवस उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला. शेवटी अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन राजेश बोपुलकर व प्रकाश रोकडे यांनी केले तर आभार अंकुश दुबे यांनी व्यकत केले.