लग्नापूर्वी वर -वधूची सिकलसेल तपासणी करणे गरजेचे -तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश मोटे 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आई आणि वडील दोघेही सीकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यामुळे त्यांच्या अपत्यांना हा सिकलसेल चा आजार होतो त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक अथवा ग्रस्त व्यक्तीने आपापसात विवाह करणे टाळावे .भावी पिढीला सिकलसेल होऊ नये म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर दोघांनीही सिकलसेल रक्ताची तपासनी करावी व सिकलसेल अपत्य जन्माला येऊ देण्याचे टाळावे असे आवाहन कामठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश मोटे यांनी जयस्तंभ चौक स्थित हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रीय नागरी प्राथमिक आरोग्य अभियान कामठी तालुका अंतर्गत तालुका आरोग्य विभाग, शासकीय उपजिल्हा रुग्णालय तसेच नागरी प्रथमिक आरोग्य केंद्र च्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम च्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.याप्रसंगी सिकलसेल नियंत्रांचा संदेश देणाऱ्या प्रभातफेरीला तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश मोटे यांच्या हस्ते हिरवी झेंडे दाखविण्यात आली.ही प्रभातफेरी हुतात्मा स्मारक येथून निघत मुख्य मार्गाने भ्रमण करीत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचली.

याप्रसंगी प्रामुख्याने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी ,डॉ सबा खान ,डॉ निशांत शेख आदी उपस्थित होते.

याप्रसांगी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी यांनी सांगितले की राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम कामठी शहरात यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे.सद्यस्थितीत सिकलसेल सोल्युबीटी चाचणी मोफत केली जात आहे.ही चाचणी पॉजिटिव्ह असल्यास हिमोग्लोबिन एलेक्ट्रोफॉरेसिस चाचणी केली जाते त्यावरून रुग्ण ग्रस्त आहे की वाहक आहे त्यावरून आलेल्या लक्षणांवरून औषधी दिले जाते .वाहक रुग्णाला पिवळे कार्ड तर ग्रस्त रुग्णाला लाल कार्ड देण्यात येते.निरोगी व्यक्तीला पांढरे कार्ड दिले जाते .म्हणून पिवळे-पिवळे,लाल -लाल, पिवळे-लाल कार्ड व्यक्तींनी विवाह करू नका त्यांनी पांढरे कार्ड व्यक्तीशी विवाह करा जेणे करून सिकलसेल ग्रस्त पिढी निर्माण होणार नाही.तसेच सिकलसेल रुग्णाकरिता इतर शासकीय सुविधा असुन संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 1000 रुपयांची मदत, महात्मा फुले जिवनदायी योजनेचा लाभ, सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेच्यााावेळी प्रति तास 20 मिनिटे अतिरिक्त वेळ, महाविद्यालयीन तसेच बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी लेखनिकाची मदत , उपचारादरम्यान सिकलसेल रुग्ण व त्याच्या एका मदतनीसास मोफत एसटी प्रवास अशा सुविधा असल्याचे माहितीसुद्धा दिली.

या जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन कार्यक्रमात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात 27 विवाहित जोडप्यांची सिकलसेल तपासणी करण्यात आली त्यात एक रुग्ण सिकलसेल पॉजिटिव्ह आढळला.

या जागतिक सिकलसेल दिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी, रश्मी वानखेडे,सुमित्रा वाघधरे,रंजना कौरती,सुषमा दिवान,ज्योती धनगर, स्वाती भवसागर,नीलम खोब्रागडे,, सीमा नगरारे,सुनीता तिजारे, सत्यप्रभा मेंढे यासह आशा वर्कर आदींनी मोलाची आरोग्य सेवा पुरविली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बादाम की अच्छाइयों के साथ मनाएं अंतरराष्ट्रीय योग दिवस 

Wed Jun 19 , 2024
भारत :- हर साल 21 जून को मनाया जाने वाला योग दिवस, स्वास्थ्य और तंदुरुस्ती पर योग के व्यापक प्रभाव को बताता है। योग को शामिल करने से उसके शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्वास्थ्य को बेहतर बनाने के महत्व को बताना ही इस दिवस का उद्देश्य है। योग का ज्यादा से ज्यादा लाभ लेने के लिए संतुलित, स्वच्छ और सेहतमंद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!