नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे सचिव प्रफुल्ल फरकसे शुक्रवारी मनपाच्या ४० वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले. मनपा सचिव कक्षात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात कार्यक्रमाध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे प्रामुख्याने उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी स्थायी समितीच्या सभापती सर्वश्री बंडू राऊत, नरेंद्र (बाल्या) बोरकर, प्रदीप पोहणे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार आणि नयना फरकसे उपस्थित होते. मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी देखिल आपल्या कक्षात फरकसे यांच्या शाल, श्रीफळ, मनपाचा मानाचा दुपट्टा आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.
फरकसे वर्ष १९८४ मधे तांत्रिक सहायक पदावर मनपाच्या सेवेत रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी बरेच विभागामध्ये आपली सेवा दिली. सेवानिवृत्ती वेळी ते सचिव पदावर कार्यरत होते.
या प्रसंगी कृष्णा खोपडे यांनी फरकसे सोबत आपल्या जुन्या आठवणीना उजेड दिला. त्यांनी सांगीतले की, फरकासे यांनी स्थायी समितीच्या सभापती सोबत काम केले आहे. मनपाच्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्प तयार करताना त्यांचा मोठें सहकार्य सर्वांना लाभला आहे. तिवारी यांनी देखील फरकसे यांच्या बद्दल आपल्या जुन्या आठवणीं सांगितल्या. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी तालेवार, श्रीकांत देशपांडे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष सोनी यांनी केले. यावेळी सर्वश्री सिंघामजोडे, मनोज जोशी राजेश जामनकर, जयंत भोयर, विलास ध्रुवे, श्याम माटे, शिवनकर, उमा तिवारी, प्रामुख्याने उपस्थित होते.