संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– धम्ममय वातावरणात महापरित्राणपाठ व धम्मदेसना संपन्न
कामठी :- बुद्ध जयंती अर्थात वैशाख पौर्णिमा हा एक महत्त्वपूर्ण व पवित्र दिवस आहे.आजच्याच दिवशी वैशाख पौर्णिमेला तथागत गौतम बुद्धांचा जन्म,ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण झाले.या पवित्र दिवशी तथागताचा शांतीचा संदेश जगाला देण्याकरिता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथुन ‘पंचशील शांती मार्च’चे आयोजन करण्यात आले होते.आज संपूर्ण जगामध्ये अराजकता,हिंसाचार,अशांतता पसरलेली आहे.अशा परिस्थितीत तथागताचा शांती,मैत्री व मानवकल्यांणकारी विचारांची गरज संपूर्ण जगाला असल्याचे मत ऍड सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केले.
वैशाख पोर्णिमेच्या निमित्ताने विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ते डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर्यंत ‘पंचशील शांती मार्च’काढण्यात आले होते.या ‘पंचशील शांती मार्च’ मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या उपासक उपासिका, धम्मसेवक, धम्मसेविका,शिक्षकगण, विद्यार्थी इत्यादिना मार्गदर्शन करताना ऍड सुलेखा कुंभारे यांनी वरील मनोगत व्यक्त केले.सुरुवातीला विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर मेणबत्ती अगरबत्ती लावून त्रिशंरण पंचशील घेण्यात आले.याप्रसंगी जापाणी पद्धतीची वंदना व ध्यान साधना सुद्धा करण्यात आली.
100 मीटरचा श्रीलंकेवरून आणलेला पंचशील ध्वज घेऊन ‘पंचशील शांती मार्च’ची सुरुवात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथुन करण्यात आली. बुद्धम शरानम गच्छामि म्हणत हा शांती मार्च ड्रॅगन पॅलेस परिसरात भ्रमण करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पोहोचला.परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करीत ‘पंचशील शांती मार्च’चा समारोप करण्यात आला.
– पुज्यनिय भिख्खू संघाच्या उपस्थितीत महापरित्राणपाठ व धम्मदेसना संपन्न
—वैशाख पोर्णिमेच्या पाश्वरभूमीवर 22 मे ला सायंकाळी 7 वाजता ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्यनिय भिख्खू संघाच्या उपस्थितीत महापरित्रणपाठ व धम्मदेसना संपन्न झाले.यावेळी पुज्यनिय भन्तेजी डॉ मेत्तानंद महाथेरो,पुज्यनिय भन्तेजी बोधिरत्न थेरो,पुज्यनिय भन्तेजी कौटिन्य,पुज्यनिय भन्तेजी सोबिदा,पुज्यनिय भन्तेजी ज्योतिबोधी, पुज्यनिय भन्तेजी नंदिता यांना ऍड सुलेखा कुंभारे यांच्या वतीने धम्मदान देण्यात आले.मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपसिका,धम्मसेवक धम्मसेविका यांनी उपस्थित राहून धम्मलाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओगावा सोसायटी, ड्रॅगन पॅलेस टेम्पल,ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर,डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, हरदास विद्यालय,हरदास प्राथमिक शाळा,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल,दादासाहेब कुंभारे विद्यालय,दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र येथील विद्यार्थी ,शिक्षकगण ,कर्मचारी वृंद व इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.