संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- खंडाळा (निलज) येथील रविंद्र काळबांडे याने घरी कुणीही नसताना घराचे छताचे लोखंडी पाईपला लुगडयाने गळफास लावुन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसानी मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे.
रविंद्र नामदेव काळबांडे वय ३४ वर्षे हा आई वडीला सोबत खंडाळा (निलज) ता. पारशिवनी येथे राहायचा. त्याचे लग्न झाले असुन त्याची पत्नी प्रिती ही मुलगा स्पर्श याचे सोबत गणेशपेठ नागपुर येथे मागिल ३ वर्षापासुन राहते व नागपुर येथे खाजगी नौकरी करते. रविंद्र हा पण पत्नी बरोबर राहायचा परंतु मागिल एक महिन्या पासुन आई वडीला कडे खंडाळा येथे राहत होता. (दि.२८) एप्रिल २०२४ ला त्याची आई विमलाबाई काळबांडे व वडिल नामदेव काळबांडे हे मामा गंगाधर खरवडे यांच्या पुतण्याचे लग्नाकरिता पारडी नागपुर येथे गेले होते. त्यामुळे रविंद्र हा एकटाच खंडाळा येथे होता. गुरूवार (दि.२) मे २०२४ ला सकाळी ८ वाजता पारडी येथे होते, तेव्हा मामा गंगाधरला भासी वैशाली भुजाडे रा. रामटेक हिने फोन करून सांगितले कि, रविंद्र काळबांडे याचे घरचे किरायेदाराने तिला फोन करून सांगितले कि, रविद्र ने घरी फासी लावली आहे. यामुळे मामा गंगाधर, बहीण विमलाबाई काळबांडे व भाउजी नामदेव काळबांडे व इतर नातेवाई मिळुन खंडाळा येथे आले तर तेथे कन्हानचे पोलीस व रविद्र चे भाउजी सुनिल शंकर रोकडे हे होते. आणि रविंद्र चे प्रेत रूम मध्ये खाली ठेवलेल होते. तेव्हा सुनिल रोकडे यांनी सांगितले कि त्याला माहिती मिळताच तो घरी गेला तेव्हा रविंद्र घराचे छताचे लोखंडी पाईपला लुगडयाने गळफास लावलेला होता. त्यानंतर पोलीस आले व त्याला खाली काढले परंतु रविंद्र हा मरण पावलेला होता. रविंद्र नामदेव काळबांडे याने कोणत्या कारणाने फासी लावुन मरण पावला त्या बाबत काही माहित नसुन त्याचे मरणा बाबत कोण ताही संशय वगैरे नाही. अश्या फिर्यादी मामा गंगाधर रामेश्वर खरवडे वय ४८ वर्ष रा.आजनगाव ता मौदा यांच्या तोंडी बयाणावरून कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग क्र.१२/२०२४ कलम १७४ जा. फौ अन्वये दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.