संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कन्हान पोलीसाची कारवाई, २०,३६,००० रू. चा मुद्देमाल जप्त
कन्हान :- तारसा रोड वाघधरे वाडी जवळील नागपुर बॉयपास पुलाखाली कन्हान पोलीसानी अचानक नाकाबंदी करून निलज, खंडाळा मार्गे नागपुर कडे अवैद्यरित्या वाळुची वाहतुक करणारा दहा चाकी टिप्पर ट्रक पकडुन कन्हान पोस्टे ला फरार टिप्पर ट्रक चालक व मालका विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे.
सोमवार (दि.२९) एप्रिल ला कन्हान पोलीस स्टेशन चे पोहवा सतिश फुटाने, पोना आशिक कुंभरे , पोशि कोमल खैरे हे पोस्टे परिसरात खाजगी वाहनाने सिहोरा शिवारात पेट्रोलिंग करित असतांना ११.३० वाजता दरम्यान गोपनीय सुत्रा कडुन माहीती मिळाली की, दहा चक्का टिप्पर ट्रक क्र.एमएच ४९ एटी १८१७ निलज खंडाळा मार्गे नागपुर कडे अवैधरित्या विना परवाना वाळु टिप्पर मध्ये भरून वाहतुक करित आहे. अश्या खात्रीशीर मिळालेल्या माहितीने तारसा रोड वरील वाघधरे वाडी नागपुर बॉयपास पुलाखाली अवैध वाळु वाहतुक संबंधाने अचानक नाकाबंदी करून दहा चक्का टिप्पर ट्रक क्र. एमएच ४९ एटी १८१७ येताना दिसुन आल्याने त्यास थांबण्याचा इशारा केला. परंतु सदर टिप्पर हा जवळ न थांबता दुर अंतरावर थांबल्या ने त्याचे जवळ जावुन त्यास विचारपुस केली तर ट्रक मध्ये वाळु असुन तीचा परवाना (रॉयल्टी) नसल्याचे सांगुन वेळ पाहुन चालक तेथुन पळुन गेला. टिप्परची पाहणी केली असता त्यात अवैधरित्या वाळु दिसुन आल्याने एक पांढया व निळ्या रंगाचे टाटा कंपनीचे दहा चक्का टिप्पर ट्रक किमत २०,००,००० रूपये, ६ ब्रॉस वाळु किमत ३६००० रूपये असा एकुण वीस लाख छत्तीस हजार (२०,३६,०००) रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शनात सरकार तर्फे फिर्यादी पोशि निखिल उदयशंकर मिश्रा पोस्टे कन्हान यांचे तक्रारीने कन्हान पोस्टे ला फरार टिप्पर ट्रक चालक व मालक यांचे विरुध्द कलम ३७९ भादंवि, सहकलम ४८ (७) (८) महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६, सहकलम ४, २१ खान आणि खनिज अधिनियम १९५७, सहक लम ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनि यम १९८४ अन्वये गुन्हा दाखल करून फरार आरोपीं ताचा कन्हान पोलीस शोध घेत आहे.
सदर कारवाई कन्हान पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शनात पोहवा सतिश फुटाने, पोना आशिक कुंभरे, पोशि कोमल खैरे, निखिल मिश्रा, दीपक कश्यप, रवि मिश्रा आदीनी यशस्विरित्या पार पाडली.