संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याची कुणकुण कामठी नगर परिषद प्रशासनाला लागताच मूलभूत सोयी सुविधा, दलित वस्तीची निविदा मार्गी लावण्यासाठी कामठी नगर परिषद च्या बांधकाम विभागाने रात्रंदिवस कामकाज करून 17 कोटी रुपयाच्या कामांची प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश दिले आहेत त्यामुळे शहराच्या विकासाला अधिक गती येणार आहे.
लोकसभा निवडणुकीची रेलचेल सुरू असून आदर्श आचारसंहिता 16 मार्च रोजी निवडणूक आयोगाने लागू केली आहे.कामठी नगर परिषद चे प्रशासक संदीप बोरकर यांच्या नियोजनाने मूलभूत सोयी सुविधा योजना व नागरी दलितेत्तर वस्त्यामध्ये सुधारणा योजने अंतर्गत असे एकूण 17 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या निविदा आचारसंहितेपूर्वी मार्गी लावण्यासाठी बांधकाम विभागातील संजय जैस्वाल, सुजित आदी कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस कामकाज हाताळून निवेदीची प्रक्रिया पूर्ण केली व 17 कोटी रुपयांच्या कामांचे कार्यारंभ आदेश काढण्यात आले.त्यामुळे शहरातील रस्ते,नाली आदी कामे विविध प्रभागामध्ये सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.