विभागीय आयुक्तांच्या हस्ते लोकसभा पूर्वपीठिका-२०२४चे प्रकाशन

Ø विदर्भातील लोकसभा मतदार संघातील वर्ष २००४ ते २०१९ महत्वपूर्ण माहितीचा समावेश

नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने तयार करण्यात आलेली विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिकेचे आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पूर्वपिठिकेचे प्रकाशन झाले. सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक गणेश रामदासी, शासकीय मुद्रणालयाचे व्यवस्थापक केतन लाड, माध्यम समन्वयक अनिल गडेकर, सहायक संचालक पल्लवी धारव, विभागीय माहिती केंद्राचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार यावेळी उपस्थित होते.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वपीठिकेच्या माध्यमातून महत्वपूर्ण संदर्भ उपलब्ध झाले आहेत.ही संदर्भ पुस्तिका सर्वांसाठीच उपयुक्त ठरणारी आहे.माहिती व जनसंपर्क विभागाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त करतांना विभागीय आयुक्त बिदरी म्हणाल्या की, माध्यम प्रतिनिधी तसेच निवडणुकीशी संबंधीत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना ही पुस्तिका तात्काळ संदर्भासाठी उपयुक्त ठरणार आहे. ही संदर्भ पुस्तिका अल्पावधीत व परिपूर्ण माहितीसह सुबक पद्धतीने तयार केल्याबद्दल बिदरी यांनी माहिती विभागाचे कौतुक केले.

रामदासी यांनी पूर्वपिठिकेचे महत्व विषद करत माध्यम प्रतिनिधी व लोकसभा निवडणुकीतील विविध अधिकाऱ्यांना ही पुस्तिका संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरेल असे सांगितले. ही पुस्तिका नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये वितरीत करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अनिल गडेकर यांनी प्रास्ताविक केले तर रितेश भुयार यांनी आभार मानले.

पूर्वपीठिका २०२४मध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कार्यक्रम, विधानसभा मतदार संघनिहाय मतदार व मतदान केंद्राबाबत माहिती, विदर्भात झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक वर्ष २००४ ते २०१९चे निकाल तसेच मतदारांची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, इतर अधिकारी, तसेच विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ,माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती आदींसह निवडणूक आचारसंहिता, मार्गदर्शक तत्वे, राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या मार्गदर्शनासाठी आदर्श आचार संहिता, वृत्तपत्रांसाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्वे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची माहिती, पेड न्युज, सोशल मिडिया, निवडणूक विषयक नियमांतील ठळक बाबी आदींचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घनदाट जंगलांचे घटणारे प्रमाण चिंताजनक - राहूल पांडे

Fri Mar 22 , 2024
– अशोक काविटकर यांना ‘वनसंवर्धन’ पुरस्‍कार प्रदान नागपूर :- जल, जमीन, जानवर या तीन महत्‍वाच्‍या घटकांचा समावेश असलेल्‍या सृष्‍टीशी नाते सांगणारी आपली संस्‍कृती आहे. या संस्‍कृतीचाच -हास होत चालला आहे. वाघ, हत्‍ती सारख्‍या प्राण्‍यांचे पालनपोषण करणा-या घनदाट जंगलांचे प्रमाण दिवसेंदिवस घटत असून ही बाब चिंताजनक आहे, असे मत माहिती आयुक्‍त राहूल पांडे यांनी व्‍यक्‍त केले. वनराई फाउंडेशन आणि महाराष्‍ट्र राज्‍य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!