नागपूर :- ‘महाराजा सयाजीराव गायकवाड’ – सारथी गुणवंत मुला- मुलींना परदेशात उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना 2023-24 जाहीर करण्यात आली आहे. इच्छुकांनी दिनांक १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करावा, असे छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था विभागीय कार्यालय यांनी कळविले आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही संस्था महाराष्ट् राज्यातील मराठा, कुणबी- मराठा, मराठा – कुणबी या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाठी नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली स्थापन करण्यात आली आहे. अधिक माहिती www.sarthi.maharashrta.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी विभागीय कार्यालयाचे उपव्यस्थापकीय संचालक हरिष भामरे यांनी केले आहे.