नागपूर :- अमर सेवा मंडळ द्वारा संचालित कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा चौक, नागपूर येथे दि. 3 ते 5 फेब्रुवारी 2024 दरम्यान सांस्कृतिक महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले. या सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सांस्कृतिक महोत्सवांर्तगत दि. 04.02.2024 रोजी बशीरा वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अगर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी तसेच संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. स्मिता वंजारी यांच्या शुभहस्ते यशस्वी विजेत्यांना बक्षीस तसेच मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी प्राध्यापक डॉ. वासुदेव गुरनूले उपस्थित होते.
यावेळी अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी यांनी सर्वप्रथम विविध स्पर्धेतील यशस्वी विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या, विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात अभ्यासासोबतच कलागुणांचा व कौशल्याचा विकास करावा असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता महाविद्यालयात विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे व खेळाचे प्रदर्शन करून आपले तसेच देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे मोलाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयातील विविध स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्याकरिता हार्दीक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संबालन प्राध्यापिका सौ. मृणाल वलिवकर यांनी केले तर आभार स्वप्नाली कढव यांनी मानले. या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कमला नेहरू महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सांस्कृतिक महोत्सवाच्या शेवटी दि. 5.2.2024 रोजी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.