सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ११६ प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. गुरुवार (ता.२१) रोजी उपद्रव शोध पथकाने ११६ प्रकरणांची नोंद करून ५१७०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत २२ प्रकरणांची नोंद करून ८८०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०८ प्रकरणांची नोंद करून ८०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०६ प्रकरणांची नोंद करून २४०० रुपयांची वसुली करण्यात आली.

वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ११ प्रकरणांची नोंद करून १५५०० रुपयांची वसुली करण्यात आली.वर्कशॉप, गरज व इतर दुरुस्तीचे व्यावसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली.

सार्वजनिक रस्ता फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकाम मलबा टाकून कचरा टाकणे/साठवणे, प्रथम ४८ तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून ५००० रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास ६१ प्रकरणांची नोंद करून रु. १२२०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०६ प्रकरणांची नोंद करून रु ६००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत विविध प्रात्यक्षिक स्पर्धा 6 जानेवारीला

Fri Dec 22 , 2023
– उत्कृष्ट चमूंना उद्घाटन आणि समारोप सोहळ्यात सादरीकरणाची संधी नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत 6 जानेवारी 2024 रोजी चिटणीस पार्क, महाल येथे विविध प्रात्यक्षिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 12 जानेवारी ते 28 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 12 जानेवारीला महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आणि 28 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com