– वरिष्ठ नागरिक परिसंघ, विदर्भ प्रदेशाचे वतीने सर्व नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिर आणि नेत्रदाना चा कार्यक्रम संपन्न
नागपूर :-75 व्वा आजादी का अमृत महोत्सवानिमित्त वरिष्ठ नागरिक परिसंघ, विदर्भ प्रदेश आणि माधव नेत्रालय यांच्या सौजन्याने नेत्र पंधरवडा चे औचित्य साधून दिनांक ७ सप्टेंबर गुरुवार रोजी माधव नेत्रालय व वरिष्ठ नागरिक परिसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबीर काँग्रेस नगर येथील भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात संपन्न झाला.
नेत्र तपासणी शिबीराचे उद्घाटन माधव नेत्रालयाचे उपाध्यक्ष निखिल मुंडले याचे शुभहस्ते झाले. सुरवातीलाच दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. भारतीय मजदुर संघाचे अखिल भारतीय महामंत्री रविन्द्र हिमते, वरिष्ठ नागरिक परिसंघाचे राष्ट्रीय महामंत्री वसंतराव पिंपळापुरे, भा.म.संघाचे विदर्भ प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते निखिल मुंडे यांनी नेत्रदाना संबंधीत माहिती सांगून त्यांचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांनी एक चांगला उपक्रम म्हणून वरिष्ठ नागरिक परिसंघाचे कौतुक केले. वरिष्ठ नागरिक परिसंघाचे अखिल भारतीय महामंत्री वसंत पिंपळापुरे यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वसंत पिंपळापुरे यांनी प्रास्ताविक व अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन केले.
विवेक देशपांडे अ.भा. उपाध्यक्ष यांनी सर्वप्रथम प्रमुख पाहूण्यांचा परीचय करून दिला. प्रदेश महामंत्री सुधीर डबीर यांनी संचालन केले. अ. भा. संघटन मंत्री चंद्रकांत देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
शिबिरात तपासणी साठी संघठनेचे अनेक मान्यवर व कामगार बंधू उपस्थित होते.
त्यात प्रामुख्याने सर्वश्री नाना आकरे, प्रकाश वणीकर, राम तेलंग, विजय ठाकरे, सुरेश चौधरी , राजीव पांडे, विनायक जोशी, बॅक ऑफ इंडीया, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बॅंक व इंश्युरन्स पेन्शनर संघटणेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यात सर्वश्री मिलींद देशपांडे, अशोक खराटे, चंद्रहास गावंडे, शरद हांडेकर यांनी खुप परिश्रम घेतले.
शिबिरात आज 60 लोकांनी नेत्र तपासणी करून घेतली.तसेच 20 जणांनी नेत्र दान संकल्प केला.