संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील धारगाव, पावनगाव,घोरपड,रणाळा, लिहिगाव या गावातील परिसरात नागपूर बायपास रस्ता बांधकामाचे काम बन्सल कन्स्ट्रक्शन कंपनी करीत आहे.या कंपनीच्या वतीने रस्ता बांधकामासाठी उपयोगात आणणारे राखळ तसेच इतर गौण खनिज रस्त्यालगत टाकून ठेवले आहे.नुकत्याच जुलै महिन्याच्या 25,26 व 27 जुलै ला झालेल्या अतिवृष्टीमुळे ही राखळ पाण्यासोबत अनेक शेतकऱ्यांच्या शेतात वाहून गेले. ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेती नुकसान झाले असून ही नुकसान पोकळी भरून निघण्यासारखी नाही आहे. पण या नुकसान संदर्भात बन्सल कंपनीला काहीही दुःख वाटत नसून कंपनीचा हा मनमानी कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे.तर यासंदर्भांत बन्सल कन्स्ट्रक्शन कंपनीला निवेदन देऊन रस्ता दुरुस्ती सह शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जी प सदस्य दिनेश ढोले यांच्या नेतृत्वात करण्यात आली.मात्र सदर कंपनीने या निवेदनाला केराची टोपली दाखवून कुठल्याही उपयोजना केल्या नाही.
तेव्हा या बन्सल कन्स्टरक्षण कंपनीवर गुन्हा दाखल करून नुकसान झालेंल्या सर्व शेतकऱ्यांना प्रति एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी .येत्या आठ दिवसात शेतकऱ्याना नुकसान भरपाई न दिल्यास बन्सल कंपणीविरुद्ध आंदोलन पुकारून काम बंद करण्यात येणार असल्याचा ईशारा जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांनी जिल्हाधिकारी नागपूर, तहसीलदार कामठी व पोलिस निरीक्षक मौदा ला दिलेल्या निवेदनातून केला आहे.