संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– मागील कित्येक वर्षापासुन रखडलेली भूमिगत गटार योजना पूर्णत्वास येण्याचा मार्ग मोकळा
कामठी :- कामठी शहराची स्थापना ही इंग्रज राजवटीत झाली असून नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे तालुकादर्जाप्राप्त कामठी शहरातील कित्येक जागेची लीज मुदत संपूनही लिजधारक जागेचा ताबा नगर परिषद परत देण्यास टाळाटाळ करीत होते मात्र कामठी शहराच्या विकास हित साध्य करण्यासाठी लीज मुदत संपलेल्या अशा जागा स्थानिक नगर परिषद प्रशासनाने ताबा घेण्यास एक पाऊल पुढे करीत समर्थता दर्शविली आहे.त्यानुसार कामठी शहरातील अतिशय औचित्याचा मुद्दा असलेला राणी तलाव मोक्षधाम नजीकच्या जागेत असलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हे कामठी नगर परिषद च्या विकास आराखड्यात घनकचरा प्रकल्पासाठी आरक्षित असलेली आनंद नगर येथील सर्व्हे क्र 20/1 च्या जागेत स्थानांतरित करण्यात येणार असून पूर्वी असलेल्या सर्व्हे क्र 29 च्या घनकचरा प्रकल्प केंद्राच्या खाली जागेत अत्याधुनिक बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार असून यामध्ये अत्याधुनिक पद्धतीने सांडपाणी व मलनिस्सारण प्रक्रिया होणार आहे ज्यामुळे मागील कित्येक वर्षांपासून रखडलेली कामठी शहरातील भूमिगत गटार योजना पूर्णत्वास जाणार आहे.वास्तविकता घनकचरा व्यवस्थापन जागेचा मुद्दा निकाली काढण्यासाठी नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विधापरिषद सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुद्द महसूल मंत्र्याशी संवाद साधून घनकचरा प्रकल्पासाठी हिंदुस्थान मिल्स ला दिलेली लीज रद्द करवून घेत नागरी हितासाठी ती जागा नगर परिषद च्या विकास आराखड्यावर घनकचरा प्रकल्पासाठी आरक्षित जागेवर ताबा घेण्यात अथक प्रयत्न केले अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक प्रयत्नाला यशप्राप्त झाले व येथील औचित्याचा मुद्दा असलेला घनकचरा प्रकल्पाचा मुद्दा निकाली लागल्याने नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कामठी शहर हे ऐकूण 729.00हॅकटर आर क्षेत्रफळात वसले असून शीट क्र 11 येथील सर्व्हे नं 20 मधील हिंदुस्थान मिल्स लिमिटेड ला 31 मार्च 2020 पर्यंतच्या लीज मुदतीवर 2.93 हे आर क्षेत्रफळ जागा देण्यात आली होती मात्र मुदत संपूनही या जागेचा ताबा सोडत नव्हता जे की ही जागा कामठी नगर परिषद च्या विकास आराखड्यात घनकचरा प्रकल्पासाठी आरक्षित आहे .वास्तविकता सध्यस्थीतीत सर्व्हे नं 29 वर असलेले घनकचरा प्रकल्पाच्या जागेत बायोगॅस प्रकल्प उभारणीचे प्रस्तावित होते मात्र पर्यायी जागा ताब्यात येत नसल्याने विकास आराखडयानुसार आरक्षित जागा ताब्यात घेणे हे कामठी नगर परिषद ला एक आव्हानच होते अशा स्थितीत माजी पालकमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा विषय गांभीर्याने लक्षात घेत नागरी हितार्थ पुढाकार घेऊन खुद्द महसूल मंत्र्याशी भेट घालून कामठी शहराच्या विकासासाठी सदर आरक्षित जागा कामठी नगर परिषद च्या ताब्यात देण्याचे आदेशाला महसूल मंत्री कडून मंजुरी मिळवून घेतली.त्यानुसार घनकचरा प्रकल्प हा पूर्ववत जागेतून स्थानांतरित होत आनंद नगर येथे स्थानांतरित होईल तर पूर्ववत घनकचरा प्रकल्प च्या ठिकानी अत्याधुनिक पद्धतीचे बायोगॅस प्रकल्प होणार आहे .यामुळे या भूमिगत गटार योजनेला नवसंजीवनी मिळत या भूमिगत गटार योजनेतुन शहरातील सांडपाणी व मलनिसारण चा मार्ग मोकळा होत शहरातील अस्वछता दूर होईल व कामठी शहर स्वच्छ व सुंदर असे स्मार्ट सिटी बनेल.
या विकासकामामुळे कामठी शहराचे हित साध्य होत असल्याने नागरिकांत समाधानाची भावना आहे तर या विकासकामासाठी माजी पालकमंत्री व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची मोलाची भूमिका असून कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी संदीप बोरकर, विक्रम चव्हाण, विजेंद्र चव्हाण, अमोल कारवटकर,स्वास्थ्य निरीक्षक विजय मेथीयां आदींनी मोलाची भूमिका साकारली.