नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवार (ता.03) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. विलास परने, रामदासपेठ, नागपूर यांच्यावर परवानगीशिवाय फुटपाथजवळ टिन शेडचे अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. चावला बिल्डर्स, छापरु नगर, सि.ए. रोड, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. परमात्मा एक स्विटस, बिनाकी, जामदरवाडी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.