राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे प्रथमच सिक्कीम स्थापना दिवस साजरा

– विविध राज्यांचे राज्यस्थापना दिवस साजरे केल्याने एकात्मतेची भावना दृढ होईल – राज्यपाल रमेश बैस

मुंबई :- विविध भाषा, बोली, संगीत व खाद्य संस्कृतीने नटलेला भारत एक सुंदर पुष्पगुच्छ आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सांस्कृतिक आदान प्रदान झाल्यास नागरिकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होईल. या दृष्टीने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमा अंतर्गत प्रत्येक राज्यात इतर राज्यांचे स्थापना दिवस साजरे करण्याचा शासनाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.            राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सिक्कीम येथील कलाकारांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. १६) राजभवन येथे ‘सिक्कीम राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

दिनांक १६ मे १९७५ रोजी सिक्कीम भारताचे २२ वे राज्य झाले. त्या दिवसापासून सिक्कीमने मोठी प्रगती केली असून देशाच्या विकासात देखील मोठे योगदान दिले आहे. सिक्कीम हे देशातील हरित राज्य असून पर्यावरण रक्षणाबाबत हे राज्य इतर राज्यांकरिता मार्गदर्शक आहे असे राज्यपालांनी सांगितले.

उंच बर्फाच्छादीत पहाड असलेले सिक्कीम पर्यटकांचे आकर्षण असून येथील निसर्ग सौंदर्य व विविधतेमुळे सिक्कीम म्हणजे स्वर्गीय राज्य आहे. या राज्याने डॅनी डेंग्जोपा, बायचुंग भुतिया सारखे रत्न देशाला दिले आहे असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी सिक्कीमच्या गुरुंग जमातीचे घाटू नृत्य, सोराती नृत्य, अक्षैमा गीत, तमांग सेलो नृत्य तसेच सिक्कीमच्या वाद्यवृंदाचे सादरीकरणे झाले.

महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलक दाखविणारे शिववंदना, लावणी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे देखील यावेळी सादरीकरण करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हाधिकारी सांगली यांनी ट्रक टर्मिनल उभारणीबाबत प्रस्ताव तयार करावा - मंत्री शंभूराज देसाई

Wed May 17 , 2023
मुंबई :- माल वाहतूक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहन तळ अपुरे पडतात. सांगली महानगरपालिकेच्या मालकीच्या ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित असलेल्या १७ एकर जागेवर अद्ययावत ट्रक टर्मिनल उभारणीसाठी जिल्हाधिकारी सांगली यांनी प्रस्ताव तयार करावा, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. आज मंत्रालयात मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट यांच्या मागण्यांबाबत बैठक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com