टिपू सुलतान यांच्याविषयी चुकीचं बोललो असेन तर राष्ट्रपतींना जाऊन विचारा – नवाब मलिक

मुंबई दि. २७ जानेवारी – मी टिपू सुलतान यांच्याविषयी चुकीचं बोललो असेन तर राष्ट्रपतींना जाऊन विचारा… राष्ट्रपती भवनमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करा असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला दिला आहे.

दरम्यान ज्याप्रकारे वाद निर्माण केला जात आहे… वातावरण दुषित केले जात त्यावरुन टीपू सुलतान यांचा अपमान केला जात आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

कर्नाटकमध्ये भाजपचे नेते येदुराप्पा हे टिपू सुलतान यांची जयंती साजरी करत होते. मात्र मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी निर्णय बदलला असेही नवाब मलिक म्हणाले.

राष्ट्रपती कोविंद यांनी टिपू सुलतान यांना धाडसी शहीदाचा दर्जा देताना देश त्यांना विसरु शकत नाही असे भाषण केले होते याची आठवणही भाजपला नवाब मलिक यांनी करुन दिली आहे.

टिपू सुलतान इंग्रजासमोर शरण गेला नाही. जी व्यक्ती इंग्रजासमोर झुकली नाही त्यांच्या नावावर वाद उभा केला जात आहे हे राजकारण असून प्रविण दरेकर हे मजुर सोसायटीचे कामकाज नाही. इतिहास समजना आप के बस की बात नही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

देशभक्ति गीतों के साथ मनाया गणतंत्र दिवस

Thu Jan 27 , 2022
– गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स म्यूजिकल ग्रुप द्वारा प्रस्तुति नागपुर-  देश का गणतंत्र दिवस हो या स्वतंत्रता दिवस, मन देशभक्ति से ओतप्रोत हो जाता है। सब प्रेरित हो जाते हैं। गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड म्यूजिकल ग्रुप के कलाकारों में यह उत्साह देखने को मिला। उन्होंने विभिन्न देशभक्ति गीतों की प्रस्तुति देकर गणतंत्र दिवस मनाया। गणतंत्र दिवस के अवसर पर गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!