नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.27) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली झोन अंतर्गत बाबुळखेडा, जोगीनगर येथील M/s Orchid Icon यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नेहरुनगर झोन अंतर्गत वाठोडा चौक येथील जनाब वहिद भाई यांच्याविरुध्द रस्त्यालगत भंगार साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशीनगर झोन अंतर्गत प्रभाग न.02, आटोमोटिव्ह चौक, कामठी रोड येथील इंडियन प्लास्टिक यांच्याविरुध्द कारखान्याच्या सांडपाण्याचे कनेक्शन जवळच्या नाल्याशी जोडल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.