स्वच्छ भारत अभियान : 1025 किलो प्लास्टिक जप्त

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.20) 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 1028 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. लकडगंज झोन येथे 40 पोत्यामध्ये भरलेले सिंगल यूज 1025 किलो प्लास्टिक जप्त केले. प्लास्टिक कॅरीबॅग कोणाची आहे, याची माहिती घेण्यात येत आहे.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील महालक्ष्मी ‍डिस्पोजल या दुकानाविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे नेहरुनगर झोन अंतर्गत दिघोरी चौक येथील हदवार हॉस्पीटल यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सी-20 सदस्यांसाठी आयोजित हस्तकला प्रदर्शनाला उपमुख्यमंत्र्यांची भेट

Tue Mar 21 , 2023
नागपूर :- सी-20 परिषद आयोजनाच्यानिमित्ताने मुख्य कार्यक्रम स्थळाशेजारी हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शनात विविध स्टॉलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देवून येथील वस्तूंची पाहणी केली. याठिकाणी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, महाराष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियान, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ, आदिवासी विभाग, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, माता अमृतानंदमयी मठ, रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी, सत्संग फाउंडेशन आदि विविध संस्थांचे स्टॉल लावण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!