आमच्या मविआने व्हॅटच्या किमती कमी करुन जनतेला दिलासा दिला तसा व्हॅटच्या किमती कमी करुन राज्यातील जनतेला दिलासा द्या – जयंत पाटील

मुंबई  – महाविकास आघाडी सरकारने व्हॅटच्या किमती कमी करून गॅसची किंमत आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसा प्रयत्न करून उपमुख्यमंत्री राज्यातील जनतेला दिलासा देतील का? असा थेट प्रश्न माजी मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात केला.

आमदार जयंत पाटील यांनी पॉईंट ऑफ प्रोसीजरनुसार राज्यातील गॅस दरवाढ व वीज प्रश्न या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सभागृहाचे लक्ष वेधले.

मागील वर्षभरात केंद्रसरकारने गॅस दरात सहा वेळा वाढ केली. व्यावसायिक गॅसचा भाव २११९ वर गेला तर घरगुती सिलेंडरची किंमत ११०३ रुपयांवर गेली आहे. त्यामुळे घरोघरी चुली ही मागणी महाराष्ट्राची जनता आता करेल अशी शक्यताही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

विधानसभेचे अधिवेशन होईपर्यंत कृषी पंपांची वीजजोडणी तोडू नये, अशा सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना आधीच वीजजोडण्या मिळत नाहीत. आता उपलब्ध असलेले कनेक्शन तोडण्याचे काम होत आहे. त्यामुळे राज्यातील कृषीपंपांची ४६ हजार कोटी रुपयांची थकबाकी राज्यसरकारने तात्काळ माफ करावी, अशी आग्रही मागणीही जयंत पाटील यांनी यावेळी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वॉटर पोलो (पुरुष) स्पर्धेकरीता विद्यापीठाचा संघ घोषित

Thu Mar 2 , 2023
अमरावती – गुरू नानक देव युनिव्हर्सिटी, अमृतसर येथे 19 ते 21 मार्च, 2023 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वॉटर पोलो (पुरुष) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित झाला असून खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दिनांक 08 ते 16 मार्च दरम्यान होणार आहे. खेळाडूंमध्ये भारतीय महाविद्यालय, अमरावतीचा यश दुर्गे व आदित्य थेटे, युवाशक्ती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!