सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 139 प्रकरणांची नोंद , उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवारी (6) रोजी शोध पथकाने 139 प्रकरणांची नोंद करून 57200 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर 1 प्रकरणांची नोंद करून रु 500 रुपयांचा दंड वसुल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 34 प्रकरणांची नोंद करून 13600 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 1500 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु 1200 दंड वसूल करण्यात आलेला आहे.

मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 2000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून रु 12000 दंड वसूल करण्यात आला.

या व्यतिरिक्त इतर 62 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 12400 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून 14 प्रकरणांमध्ये 14000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिन्दू मंदिरों को सरकारीकरण से मुक्त करने सहित मंदिरों की रक्षा हेतु एकमत से प्रस्ताव पारित !

Tue Feb 7 , 2023
मंदिरों के संरक्षण हेतु ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ की स्थापना! जळगांव :- हिन्दुओं को आध्यात्मिक बल देनेवाली भारतीय मंदिर संस्कृति आज धर्मविहीन ‘सेक्यूलर’ शासन तंत्र के कारण संकट में पड गई है । हमें मिली इस दैवी धरोहर की देखभाल करना, उसका संरक्षण करना, उसका संवर्धन करना, प्रत्येक हिन्दू का धार्मिक कर्तव्य है । इसी उद्देश्य से दो दिवसीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!