रामटेक – पाचशे वर्ष झालीत जरी सद्गुरु आहेत समाधी भितरी ,श्रद्धा भाव विश्वासापरी ,दर्शन देती आजही
अशा या पाचशे वर्ष पूर्व झालेल्या सद्गुरु समाधीचे नुतनीकरण या वर्षी सन 2021 ला करण्यात आले .आणि त्याचे लोकार्पण या सद्गुरूच्या नवरात्रात करण्यात येत आहे .व्हाईट मार्बल ची ही पांढरी शुभ्र उभी समाधी,वर तुळशीवृंदावन . मध्यभागी भगवान नारायण काळ्या पाषाणाच्या मूर्तीत विराजमान आहेत.मार्बलवर कोरलेले नक्षीकाम समाधीच्या सौंदर्यात भर घालते.
18 डिसेबर ला दत्त जयंतीच्या पावन पर्वावर या महोत्सवाची सुरुवात झाली आणि ज्यांचा पुण्य तिथी महोत्सव आपण साजरा करतो ते श्री दत्तगुरु बालयोगी छोटूबाबा म्हणजे त्रैमूर्ती दत्त . “ताई मी दत्त आहे!” आणि दत्त स्वरूपाची अनुभूती फक्त ताई महाराजानाचं त्यांनी दिली. आणि तो आध्यात्मिक वारसा ताई महाराज पुढे चालवत आहेत.नारायण टेकडीवर हे सद्गुरुंचे नवरात्र सुरू असून ” ॐ नमो नारायणाय ” या अषटाक्षरी महामंत्राचा अखंड जप नऊ दिवस असतो. या महोत्सवा ची समारोप सांगता 26 डिसेंबरला सद्गुरुच्या महाभिषेकानी होते.
नऊ दिवस रोज सकाळी सद्गुरुना अभिषेक तसेच दुपारी 12 ते 4 महाप्रसाद वितरण केला जातो. शिस्तबद्ध कार्यक्रम वातावरणात चैतण्य व कानावर अष्टाक्षरी महामंत्रा च्या जपाचा ध्वनी त्यामुळे येणारा भाविक भक्त मंत्रमुग्ध होतो.
रस्त्याच्या दुतर्फा असलेले वृक्ष वनराई मुळे निसर्ग रम्य वातावरणात मन प्रसन्न होते.
आत येवून समाधीचे दर्शन घेतल्यावर मनाला वेगळी शांतता मिळते . ” न बोलुताची बोलू लागावें सुख संवाद साधावया ” . याचे प्रत्यंतर येते . आणि दर्शणार्थी क्षणभर अंतर्मुख होऊन सद्गुरुचे स्मरण करत समाधानाने स्वगृही परततो.