वेकोलि सुरक्षा अधिकारीची कारवाई १७८४० रूपयांच्या कोळश्या सह आरोपीस अटक.
कन्हान :- पोलिस स्टेशन अंर्तगत वेकोलि कामठी उप क्षेत्र खुली कोळसा खदानचा दगडी कोळसा चोरी करून टेकाडी रोडने तार फॅक्ट्रीकडे ८ ते ९ मोटरसायकल स्वार यांनी दुचाकीवर २ ते ३ बोरी अवैध कोळसा बांधुन नेत असताना कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षकांनी आरोपीस पकडुन २२३० किलो किंमत १७८४० रूपयेचा दगडी कोळसा पकडुन कन्हान पोलीसाच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
रविवार (दि.१५) जानेवारीला ९ वाजता वेकोलि कामठी उपक्षेत्र प्रभारी सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षकासह वेकोलि परिसरात पेट्रोलींग करीत असता गुप्त माहीती मिळाली की, टेकाडी रोडने तार फॅक्ट्रीकडे ८ ते ९ मोटरसायकल स्वार यांनी दुचाकीने २ ते ३ बो-या चोरीचा अवैध कोळसा बांधुन नेत आहे. अशा माहिती वरून घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता १) दुचाकी क्र. एम एच ४०- एल इ – ८३६७ चा चालक संजय बाबुलाल चव्हान रा. इंदर कॉलनी, २) दुचाकी क्र. एम एच ४० बीडी ३६६८ चा चालक विनोद छोटुजी कुसुम रा. डुमरी, ३) दुचाकी क्र. एम एच ४० व्ही ८८७७ चा चालक अजय बाबुलाल चौव्हान खदान नं ६, ४) अशोक केशवराव भोंदरे रा. टेकाडी, ५) दुचाकी क्र. एम एच ४० एसआर ६७७३ चा चालक राजेश बिहारी हुडेलीया,६) दुचाकी क्र.एमएच ४० सी ४४३ ५ चा चालक अरुण हरीराज सहारे रा. नविन गोडेगा व, ७) दुचाकी क्र. एमएच ३१ बीडी ०५५६ चा चालक भिमराव रामुजी हुमने, ८) दुचाकी क्र. एमएच ४० टी ९४२२ चा चालक ज्ञानसिंग पुरणसींग चौव्हान रा खदान नं ६ सदर आठ आरोपी वेकोलिचा कोळसा चोरी करुन नेत असतांना मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यातुन मुद्देमाल जप्त करून वजन काटयावर मोजले असता २२३० किलो असा एकुण अंदाजे किंमत १७८४० रुपयाचा मुद्देमाल कामठी खुली कोळसा खदान यार्ड येथे जमा करण्यात आला.
सदर प्रकरणी वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे यांनी कन्हान पोस्टे ला तक्रार केल्याने कन्हान पोलीसांनी आठ आरोपी विरुध्द कलम ३७९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि महादेव सुरजुसे करित आरोपीचा शोध घेत आहे.