– मनपाच्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर :- नागपूर शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारस्यासह कलेचा वारसा लाभला आहे. याच वारसाला नागपुरातील चित्रकारांनी जतन करण्याचे कार्य मनपाच्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेच्या माध्यमातून केले आहे. आपल्या कल्पनाशक्तीतून शहरातील विविध इमारतींच्या कुंपण भिंतींना चित्रकारांनी अधिक सुशोभित करून दाखविले आहे. मनपाच्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील इमारतीच्या भिंतींवर नागूपरचा समृद्ध असा कलेचा वारसा झळकत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील शासकीय व निमशासकीय इमारतीच्या कुंपण भिंतीवर, मोक्याच्या ठिकाणी भित्तीचित्र रेखाटन स्पर्धेचे (wallpainting competition)आयोजन करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे. स्पर्धेबाबत संपूर्ण नागपूरकर उत्साही होते. स्पर्धेदरम्यान नागरिक चित्रकारांचा उत्साह वाढविला. मनपाच्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला, ६०३ हुन अधिक चित्रकारांनी शहर सौंदर्यीकरणाच्या उद्देशाने कुंपण भिंतींना नाविन्यपूर्ण लूक देण्यासाठी कार्य केले. या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेत ५१५ महाविद्यालयीन विद्यार्थी गट आणि ८७ व्यावसायिक चित्रकार सहभाग नोंदवीत शहरातील इमारतींचे सौदार्यीकरण केले. या चित्रकारांना स्वच्छ भारत अभियानावर आधारित ३२ विषयाला अनुसरून शासकीय व निमशासकीय इमारतींच्या भिंतीवर चित्र काढत काढले. स्पर्धेचे साहित्य सामग्री, रंग आदी वस्तू आयोजकाकडून पुरविण्यात येत असून, स्पर्धकांच्या अल्पोपहाराची व्यवस्थाही मनपाद्वारे करण्यात आली होती. शहरातील शासकीय व निमशासकीय इमारतींच्या १० मीटर लांबीचे कुंपण भिंत व मोक्याच्या ठिकाणी स्पर्धक आपल्या कलाविष्कारातून भिंतींवर नाविन्यपूर्ण रुप प्रदान केले. चित्रकारांच्या सहा विभागाने परिसरातील इमारती केल्या सुशोभित
स्पर्धेसाठी विविध चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थी व व्यावसायिक चित्रकार यांचे सहा विभाग करण्यात आले होते, ज्यांनी शहरातील मेडिकल चौक, तुकडोजी पुतळा, वंजारी नगर पाण्याची टाकी जवळच्या नवीन पूलाच्या दोन्ही बाजू, म्हाळगी नगर, मनपा शाळेची भिंत, मानेवाडा, अजनी पोलिस स्टेशन, सक्करदरा लेन, आरपीटीएस रोड, पोलिस प्रशिक्षण केंद्र, चित्रकला महाविद्यालय, रातुम नागपूर विद्यापीठ, नीरीची भिंत, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, अजनी रेल्वे स्थानकाचे कुंपण, मोक्षधाम घाट, लक्ष्मीनगर पाण्याची टाकी, दीक्षाभूमीपुढील कुंपण भिंत, पंचवटी वृद्धाश्रम, मोठा ताजबाग, सीए रोड गांधीबाग, महाल, रमण विज्ञान केंद्राची भिंत, गायत्री मंदिरची भिंत जगनाडे चौक, कॉटन मार्केट रेल्वे स्थानक जवळ, मेहंदीबाग कॉलोनी, राणी दुर्गावती चौक, झिरो माईल चौक, विवेकानंद स्मारक अंबाझरी, कृषी विद्यापीठ आदी परिसरातील भिंतीं रंगविल्या.
या विषयांवर काढले चित्र
क्लिन हेरिटेज ऑफ नागपूर, क्लिन ऑरेंज सिटी, क्लिन टायगर कॅपिटल ऑफ इंडिया, ग्रीन सिटी, क्लिन झिरो माइल, क्लिन रिलीजियस प्लेसेस (उदा. गणेश टेकडी दीक्षाभूमी आदी.) क्लीन वॉटर बॉडी, स्पेशल फेस्टिवल ऑफ नागपूर( उदा. मारबत.), क्लीन मार्केट, डोअर टू डोअर कलेक्शन, सोर्स सेग्रीगेशन. ओला, सुका आणि घरगुती घातक कचरा, संवेदनशील ठिकाणी कचरा टाकणे, प्रोसेसिंग बाय वर्क वॉटर जनरेटर्स, होम कंपोस्टिंग, प्लास्टिक बंदी, प्लास्टिक फ्री नागपूर. सी अँड डी वेस्ट, शहर सौंदर्यीकरण (सिटी ब्युटीफिकेशन). थ्री आर प्रिन्सिपल्स (रेडियुज, रियूज, रिसायकल), ई वेस्ट मॅनेजमेंट, डेली वेस्ट कलेक्शन फ्रॉम हाऊसहोल्ड/ इस्टॅब्लिशमेंट /इन्स्टिट्यूशन, क्लीन नेबरहूड, गूगल मॅपवर सार्वजनिक शौचालये, क्लीन सिटी, पीपल बिहेवियर मॅनेजिंग देअर वेस्ट रिस्पॉन्सिबिलिटी, ओपन डेफिनेशन अँड ओपन यूरिनेशन, अक्सेसेबल अँड क्लीनर कम्युनिटी अँड पब्लिक टॉयलेट, सिवर लाईन चोक होण्यासंबंधी विषय किंवा सेप्टिक टँकची स्वच्छता आणि हाताळणी, सॅनिटरी वर्कर्स बेरिंग सेफ्टी गिअर्स, स्वच्छता संदेश, कापडी पिशवी, आदी विषयांवर चित्र काढण्यात आले.